जगातील सर्वात हलका आणि पातळ 5G iPhone; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जगातील सर्वात हलका आणि पातळ 5G iPhone; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जगातील सर्वात छोटा, पातळ आणि हलका 5G फोन iPhone सादर करण्यात आला. हा जगातील सर्वात हलका फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : Appleने एका व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे iphone 12 सीरीज लॉन्च केली. या सीरीजमध्ये कंपनीने 4 मॉडेल लॉन्च केले. या सीरीजमध्ये जगातील सर्वात छोटा, पातळ आणि हलका 5G फोन iPhone 12 mini सादर करण्यात आला. हा जगातील सर्वात हलका फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये कंपनीने iPhone 12 mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max लॉन्च केले. हे सर्व फोन 5 जी टेक्नोलॉजीवर आधारित आहेत.

iPhone 12 mini किंमत -

iPhone 12 mini फोनच्या 64GB वेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे. त्याशिवाय 128GB वेरिएंटची किंमत 74,900 रुपये इतकी आहे. तर 256GB फोनची किंमत 84,900 आहे.

हा फोन ब्लॅक, ब्लू, रेड आणि व्हाईट अशा चार रंगात उपलब्ध आहे. सध्या कंपनीने भारतातील याच्या विक्रीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

कंपनीने या फोनची साईज छोटी ठेऊन डिस्प्ले मोठा करण्यासाठी iPhone 12 mini मध्ये टच ID हटवून, फेस IDचा वापर केला आहे. यात डिस्प्लेसह साईड्समध्ये bezels देण्यात आला आहे.

iPhone 12 mini स्पेसिफिकेशन्स -

- डुअल सिम (नॅनोई-सिम)

- 5.4 इंची Super Retina XDR OLED डिस्प्ले

- सेरेमिक शिल्ड ग्लास कव्हर

- iPhone 12 mini A14 Bionic प्रोसेसर

iPhone 12 mini कॅमेरा -

यात डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील दोन्ही कॅमेरे 12 मेगापिक्सल आहेत. ज्यात वाइड-अँगल आणि एक्स्ट्रा वाइड अँगल शूटर आहे.

15 तासांपर्यंत पाहता येणार व्हिडिओ -

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, iPhone 12 mini मध्ये 15 तासांपर्यंत व्हिडिओ पाहाता येणार आहे. त्याशिवाय फोनमध्ये 15W MagSafe वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

'मिनी' मॉनिकर (mini moniker) -

Appleने आपल्या iPhone लाइनअपमध्ये पहिल्यांदा 'मिनी' मॉनिकरचा वापर केला आहे. यापूर्वी iPod mini, iPad mini आणि Mac mini मध्ये वापर करण्यात आला होता.

Published by: Karishma Bhurke
First published: October 17, 2020, 12:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या