नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : भारतात कॉलर आयडी अॅप Truecaller ला टक्कर देण्यासाठी देशी अॅप BharatCaller लाँच करण्यात आलं आहे. हे नवं BharatCaller अॅप Truecaller पेक्षा केवळ अधिक चांगलं नसून हे जबरदस्त अनुभवही देईल असा दावा कंपनीने केला आहे. BharatCaller App इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) बँगलोरचा विद्यार्थी प्रज्वल सिन्हा याने तयार केलं आहे. तर कुणाल पसरीचा या अॅपचा को-फाउंडर आहे. या दोघांना 2020 मध्ये नॅशनल स्टार्टअपच्या अवॉर्डने पुरस्कृत करण्यात आलं आहे. हे अॅप Google Play Store आणि App Store वरुन फ्रीमध्ये डाउनलोड केलं जाऊ शकतं.
मीडिया रिपोर्टनुसार, BharatCaller च्या सर्व्हरवर युजर्सचे कॉन्टॅक्स आणि कॉल लॉग्स सेव्ह केले जाणार नाहीत, जेणेकरुन त्यांच्या प्रायव्हसीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही. त्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे युजर्सच्या फोन नंबर्सचा कोणताही डेटाबेस नसतो. तसंच अशा डेटापर्यंत ते पोहोचूही शकत नाहीत.
BharatCaller App चा संपूर्ण डेटा एन्क्रिप्टेड फॉर्मेटमध्ये स्टोर होतो. यात प्रायव्हसीची अशाप्रकारे काळजी घेण्यात आली आहे, की त्याचा डेटा भारताबाहेर कोणी वापरु शकत नाही. हे अॅप इंग्रजीसह हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती भाषांमध्येही उपलब्ध आहे.
काय असतं Caller ID App?
Caller ID App अतिशय महत्त्वाचं, कामाचं अॅप ठरतं. याच्या मदतीने कोण अनोळखी व्यक्ती कॉल करतो आहे, याची माहिती मिळते. या अॅपद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव ओळखता येतं. जर कॉल करणाऱ्या व्यक्तीचा नंबर सेव्ह नसेल, तर या अॅपद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण डिटेल्स मिळतील. महत्त्वाची बाब म्हणजे, ऑनलाईन फ्रॉडच्या वाढत्या प्रकरणांत या अॅपच्या मदतीने फ्रॉड कॉल ब्लॉकदेखील करता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.