Home /News /technology /

कोण आहेत राजा चारी? NASA च्या खास मोहिमेसाठी झाली आहे या भारतीयाची निवड

कोण आहेत राजा चारी? NASA च्या खास मोहिमेसाठी झाली आहे या भारतीयाची निवड

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) चंद्रावर मानवाला पाठविण्याच्या आर्टेमिस मोहिमेसाठी तयारी सुरु केली आहे. नासाने या मोहिमेसाठी 18 जणांची नावे शॉर्टलिस्ट केली आहे.

    वॉशिंग्टन, 12 डिसेंबर : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) नेहमी मोठमोठ्या अंतराळ मोहिमा आयोजित करत असते. अमेरिकेने चंद्रावर मानवाला पाठविण्याच्या आर्टेमिस मोहिमेसाठी तयारी सुरु केली आहे. नासाने या मोहिमेसाठी 18 जणांची नावे शॉर्टलिस्ट केली आहे. या 18 मध्ये निम्मी संख्या महिला अंतराळवीरांची आहे. या यादीत भारतीय अमेरिकन असणाऱ्या राजा जॉन वुर्पूतूर चारी यांचीही निवड झाली आहे. 2024 मध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यातील तयारी पूर्ण केली असून या मोहिमेत दोन व्यक्ती चंद्रावर उतरवण्याचा नासाचा प्रयत्न आहे. या मोहिमेसाठी ओरियन क्रू यान (Orion Crew Spacecraft) चंद्रावर उतरवण्यात येणार असून यामध्ये भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा देखील समावेश आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच महिला अंतराळवीर चंद्रावर जाणार आहे. 2024 मध्ये चंद्रावर जाणाऱ्या या अंतराळ यानातून प्रथम महिला अंतराळवीर चंद्र भूमीवर उतरेल आणि नंतर पुरुष अंतराळवीर उतरेल असे नासाने यापूर्वीच जाहीर केले आहे. नासाच्या या मोहिमेमध्ये भारतीय वंशाच्या राजा जॉन वुर्पूतूर चारी याचा देखील समावेश आहे. या पूर्वी सुनीता विलियम्स आणि कल्पना चावला यांची  देखील नासाच्या अंतराळ मोहिमांसाठी निवड झाली होती. त्यानंतर आता निवड होणारे राजा चारी तिसरे भारतीय वंशाचे अंतराळवीर आहेत. कोण आहेत राजा चारी ? भारतीय वंशाचे राजा चारी (Raja Chari) हे अमेरिकन वायूसेनेमध्ये कर्नल आहेत. त्यांचे वडील हैद्राबाद येथून अमेरिकेत गेले होते. चारी यांचे अनेक नातेवाईक आजही भारतात आहेत. 43 वर्षीय राजा चारी यांनी अमेरिकेत एअरफोर्स ॲकॅडमीमधून एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून एमआयटी आणि युएस नेव्हल टेस्ट पायलट स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. 2017 पासून ते नासाशी संबंधित आहेत. नासाने चंद्रावर जाण्यासाठी 18 अंतराळवीरांची निवड केली असून यामधील केवळ एक महिला आणि एक पुरुष अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत. याचबरोबर पुढील मोहिमेमध्ये मंगळावरदेखील माणूस पाठवण्याचा नासाचा प्रयत्न असून या दशकाच्या शेवटी नासा यासाठी मोहीम आखणार आहे. (हे वाचा-मुलीच्या लग्नात 'हे' राज्य सरकार देणार सोनं, वाचा कुणाला आणि किती होईल फायदा) या टीममध्ये नासाने अगदी योग्य पद्धतीने अनुभवी आणि तरुण अंतराळवीरांची मोट बांधली आहे. या मोहिमेसाठी निवड झालेल्या या अंतराळवीरांमध्ये सर्वांत अनुभवी 55 वर्षीय अंतराळवीराचा समावेश आहे तर सर्वांत लहान 22 वर्षीय अंतराळवीराचा समावेश आहे. यामध्ये काही 30 ते 40 वर्ष या गटातील अंतराळवीर देखील आहेत. या अंतराळवीरांचे मुख्य काम हे केवळ चंद्रावर जाण्याचे नसून या मोहिमेमधील संशोधनामध्ये देखील मदत करायची आहे. यामध्ये लँडिंग सिस्टीम, प्रशिक्षण आणि टेक्नॉलॉजी संशोधन आणि हार्डवेअर संबंधित कार्य करायचे आहे. या सदस्यांना फ्लाईट असाइनमेंट देण्यात येईल. त्यामुळे या असाइनमेंटच्या माध्यमातून त्यांना संशोधन देखील करायचे आहे. टीम 'स्पेशल 18' नासाच्या या मिशनमध्ये राजा चारी यांच्या व्यतिरिक्त जोसेफ अकेबा, मॅथ्यू डोमेनिक, व्हिक्टर ग्लोव्हर, वॉरेन होवरग, जॉनी किम, जेले लिंडगारन, फ्रँक रुबीओ आणि स्कॉट टिंगल या पुरुष सदस्यांचा समावेश आहे. त्याच्याबरोबर या मोहिमेत महिलांचा देखील समावेश आहे. यामध्ये अनेकवेळा अंतराळात जाऊन आलेल्या महिला अंतराळवीरांचाही समावेश आहे. (हे वाचा-रेल्वेचे खाजगीकरण होऊन प्रवाशांना मिळणाऱ्या या सुविधा बंद होणार?) त्याचबरोबर चंद्रावर जाऊन आलेल्या महिला अंतराळवीरांचा देखील समावेश आहे. महिला अंतराळवीरांमध्ये कायला जहागीरदार, क्रिस्टिना हॅमोक कोच, निकोल ए. मान, एने मॅकलिन, जेसिका मेयर, जॅस्मिन मोगबेली, केट रुबिन्स, जेसिका वॅटकिन्स आणि स्टीफन विल्सन यांचा समावेश आहे. 42 वर्षीय स्टीफन विल्सन या तीन वेळा अंतराळात जाऊन आल्या असून त्या या टीममधील सर्वात वरिष्ठ सदस्य आहेत. यामध्ये क्रिस्टिना कोच, एने मॅक्लेन, केट रुबिन आणि जेसिका मेयर यांनी अंतराळात वॉक देखील केले आहे. त्यामुळे यांना या मोहिमेचा खूप मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर या टीममध्ये चंद्रावर जाणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीराचा देखील समावेश आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nasa, Science, Scientist

    पुढील बातम्या