मुलीच्या लग्नात 'हे' राज्य सरकार देणार सोनं, वाचा कुणाला आणि किती होईल फायदा

मुलीच्या लग्नात 'हे' राज्य सरकार देणार सोनं, वाचा कुणाला आणि किती होईल फायदा

मुलीचं लग्न हे आई-वडिलांचं स्वप्न असंत. या लग्नामध्ये मुलीच्या अंगावर चार दागिने घालण्याची भारतीय परंपरा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: आजकाल मुलीच्या लग्नात तिच्यासाठी दागिने करणं तिच्या आई-वडिलांसाठी एक मोठं आव्हान असतं. पण परंपरेखातर अनेकजण यामध्ये गुंतवणूक करतात. अशावेळी आसाम राज्य सरकारने (Assam Govermnment) राज्यातील मुलींच्या लग्नामध्ये सोनं देण्यासाठी अरुंधती गोल्ड स्कीम (Arundhati Gold Scheme) सुरू केली आहे. या स्कीममध्ये सरकारकडून सोनं दिलं जातं. राज्यातील दुर्बल घटकांंना त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

दरम्यान या योजनेतील सोन्यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. या योजनेचा फायदा घेणाऱ्या मुलीचं वय कमीत कमी 18 तर मुलाचं कमीत कमी वय 21 असलं पाहिजे. तसंच लग्नाचं स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 अंतर्गत रजिस्ट्रेशनही होणं आवश्यक असून या योजनेचा फायदा पहिल्यांदा लग्न होत असेल तरच मिळेल. त्याचप्रमाणे मुलीच्या कुटुंबाचं  वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आसाम सरकारने ही योजना सुरू केली आहे.

(हे वाचा-PAN-Aadhaar संबधित हे काम न केल्यास 10000 रुपये दंड, जाणून घ्या काय आहे डेडलाइन)

revenueassam.nic.in.या वेबसाइटवर या स्कीमविषयी अधिक माहिती देण्यात आली असून याकरता फॉर्म देखील याच वेबसाइटवर भरावा लागणार आहे. अरुंधती गोल्ड  स्कीममध्ये फॉर्म सबमिट केल्यानंतर नागरिकांचा अर्ज स्विकारण्यात आला आहे की नाही हे SMS च्या माध्यमातून त्यांना कळवण्यात येतं.

(हे वाचा-बँकेत पैसे जमा करण्यापेक्षा BEST आहे PPF चा पर्याय, हे आहेत 4 मोठे फायदे)

आसाममध्ये काही भागांमध्ये अद्यापगी अल्पवयीन मुलींची लग्न केली जातात. यामुळे त्यांचं शिक्षण आणि आरोग्य दोहोंवर वाईट परिणाम होत आहे. अरुंधती स्कीमचा फायदा घेण्यासाठी मुलीचं वय कमीत कमी 18 आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेण्यासाठी मुलींची लग्न योग्य वयात केली जातील, अशी सरकारची अपेक्षा आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 12, 2020, 10:16 AM IST

ताज्या बातम्या