जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीचं मोठं पाउल, 1 लाखांच्या बंपर बोनसची घोषणा

कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीचं मोठं पाउल, 1 लाखांच्या बंपर बोनसची घोषणा

कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीचं मोठं पाउल, 1 लाखांच्या बंपर बोनसची घोषणा

अनेक कंपन्यांनी मोठ्या स्तरावर आपले कर्मचारी कमी केले. परंतु या परिस्थितीत काही कंपन्या मात्र आपल्या कर्मचाऱ्यांची मदत करत आहेत. ग्लोबल टेक मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,15 जुलै : कोरोना व्हायरसची दुसरी (Coronavirus Second Wave) लाट काहीशी कमी होताना दिसते आहे. परंतु कोरोना, लॉकडाउनचा (Lockdown) अनेकांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली, तर कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाले. अनेक कंपन्यांनी मोठ्या स्तरावर आपले कर्मचारी कमी केले. परंतु या परिस्थितीत काही कंपन्या मात्र आपल्या कर्मचाऱ्यांची मदत करत आहेत. ग्लोबल टेक मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने या कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांना 1500-1500 डॉलर जवळपास 1 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगाराव्यतिरिक्त बोनस रुपात दिली जाईल. हा बोनस सर्वच कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. तर उपाध्यक्ष पदाच्या खालील पदावर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस रुपातील ही रक्कम मिळणार आहे, ज्यांनी 31 मार्च 2021 आधी कंपनी जॉईन केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये पार्ट टाईम कर्मचारीही सामिल आहेत. मायक्रोसॉफ्टचे चीफ पीपल ऑफिसर कॅथलीन होगन यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता नोकरीचं नो टेन्शन; ‘या’ कंपनीत ग्रॅज्युएट्ससाठी हजारो जागांसाठी होणार पदभरती Microsoft मध्ये ग्लोबली 1 लाख 75 हजार 508 कर्मचारी काम करतात. जे कर्मचारी व्हॉईस प्रेसिडेंटच्या खालील पोस्टवर आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांना हा बोनस लागू होणार आहे. मायक्रोसॉफ्टची 21 देशात ऑफिसेस आहेत. सध्या अनेक ऑफिसेस कोरोना काळात बंद ठेवण्यात आली आहेत. मायक्रोसॉफ्टआधी फेसबुकनेही (Facebook) आपल्या 45000 कर्मचाऱ्यांना 1000 डॉलर बोनस दिला होता. Amazon ने 300 डॉलर बोनस आपल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात