जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / खूशखबर! आता नोकरीचं नो टेन्शन; 'या' कंपनीत ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांसाठी हजारो जागांसाठी होणार पदभरती

खूशखबर! आता नोकरीचं नो टेन्शन; 'या' कंपनीत ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांसाठी हजारो जागांसाठी होणार पदभरती

खूशखबर! आता नोकरीचं नो टेन्शन; 'या' कंपनीत ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांसाठी हजारो जागांसाठी होणार पदभरती

आता अनेकांचा नोकरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै: कोरोनामुळे (Corona) सर्वत्र विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाहीये. काही कंपन्यांनी तर आहेत त्या कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र आता नोकरीसाठी तत्पर असणाऱ्या आणि कॉलेजमधून ग्रॅज्युएट (Graduate Jobs) झालेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. नामांकित आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys) वित्तीय वर्षात हजारो उमेदवारांना नोकरी (Infosys Jobs) देणार आहे. त्यामुळे आता अनेकांचा नोकरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. इन्फोसिसचे (Infosys) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितलं आहे की टेक कंपनी 2021-22 या आर्थिक वर्षात 35,000 महाविद्यालयीन पदवीधरांची नेमणूक करेल. त्यामुळे आता पदवीधरांची नोकरीची समस्या सुटणार आहे. इन्फोसिसचे सीओओ राव म्हणाले की, अलिकडच्या काळात डिजिटल टॅलेन्टची (Digital Talent) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आयटी क्षेत्रात नवीन कलागुणांची मागणी वाढत गेल्यानंतर काही काळानंतर हे उद्योगातील आव्हान बनलं आहे. म्हणूनच, जागतिक स्तरावर वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही वित्तीय वर्ष 2022 साठी 35,000 महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करण्याचे नियोजन केलं  आहे. जून तिमाहीत इन्फोसिसमध्ये नोकरी सोडणार्‍या लोकांची संख्या 13.9 टक्के झाली आहे. मार्च 2021 च्या तिमाहीत तो 10.9 टक्के होता. हे वाचा - परदेशात शिक्षणासाठी जायचंय पण इंग्रजीची भीती वाटतेय? मग ही पुस्तकं करतील मदत TCS ही करणार 40,000 पदांसाठी भरती क्लाउड कम्प्यूटिंग, डिजिटल पेमेंट (Digital payment) इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर जागतिक कंपन्यांनी केलेल्या वाढीव गुंतवणूकीचा भारतीय आयटी सेवा कंपन्यांना फायदा झाला आहे. याशिवाय जागतिक कंपन्यांनीही सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे. म्हणूनच आता इन्फोसिस नंतर TCS नंही (Tata Consultancy services) तब्बल 40,000 पदांसाठी भरती घेण्याचं ठरवलं आहे. खासगी क्षेत्रातील आयटी कंपन्यांमध्ये टीसीएसकडे सर्वाधिक 5 लाख कर्मचारी आहेत. गेल्या वर्षीही कंपनीनं 40 हजार पदवीधरांची भरती केली होती. टीसीएसनेही तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार तिमाही नफ्यात 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात