मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google ने आपल्याच CEO सुंदर पिचाईंच्या वाढदिवसाच्या तारखेत केला गोंधळ; सर्चमध्ये समोर आल्या दोन तारखा

Google ने आपल्याच CEO सुंदर पिचाईंच्या वाढदिवसाच्या तारखेत केला गोंधळ; सर्चमध्ये समोर आल्या दोन तारखा

एकीकडे आज त्यांचा वाढदिवस असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या जन्म तारखेवरुन वादांग निर्माण झाला आहे.

एकीकडे आज त्यांचा वाढदिवस असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या जन्म तारखेवरुन वादांग निर्माण झाला आहे.

एकीकडे आज त्यांचा वाढदिवस असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या जन्म तारखेवरुन वादांग निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली, 10 जून : सर्वात मोठं सर्च इंजिन Google चे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांचा आज म्हणजेच 10 जून रोजी वाढदिवस आहे की नाही याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. सुंदर पिचाई यांच्या जन्मदिनानिमित्त आज अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. तर काही ट्विटर युजर्सने त्यांच्या वाढदिवसाची तारीख वेगळी असल्याचं म्हटलं आहे. एकीकडे आज त्यांचा वाढदिवस असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या जन्म तारखेवरुन वादांग निर्माण झाला आहे.

Google वरच सुंदर पिचाई यांच्या दोन वेगवेगळ्या जन्म तारीख दाखवल्या जात आहेत. एक तारीख आजची म्हणजेच 10 जूनची दाखवली जात आहे. तर दुसरी 12 जुलै असल्याचं दाखवलं जात आहे.

यावर Reuters च्या एका फॅक्ट बॉक्सनुसार, सुंदर पिचाई यांचा जन्म तमिळनाडूमध्ये 10 जून 1972 मध्ये झाला. यात इंडियन एक्सप्रेसचा हवाला देण्यात आला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो, की गुगल आपल्याच सीईओंची जन्म तारीख वेगवेगळी का दाखवतोय?

(वाचा - गृह मंत्रालयाचा अलर्ट! तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान)

Google चं हे सर्च रिझल्ट पिचाई यांच्या बायोग्राफी Britannica येथून येत आहे. यात त्यांचा वाढदिवस 12 जुलै रोजी असल्याचं सांगण्यात आलं आहे. Britannica वर ज्यावेळी वाढदिवस पब्लिश करण्यात आला, त्यानंतर त्यात कोणतेही बदल केले नसल्याचं दिसतं. हे पहिल्यांदा 2 ऑक्टोबर 2016 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं.

Sundar Pichai सध्या Alphabet चे हेड आहेत. Alphabet गुगलची पॅरेंट कंपनी आहे. मूळ भारतीय असलेल्या सुंदर पिचाई यांनी Indian Institute of Technology मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यांचं बालपण चेन्नईत गेलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून Google चे सीईओ बनण्यापर्यंतच्या त्यांच्या या प्रवासात त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. अनेकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत.

सुंदर पिचाई यांनी Stanford University मधून मास्टर डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्यांनी Wharton School मधून MBA केलं. सुंदर पिचाई 2004 मध्ये Google शी जोडले गेले. त्यांनी गुगलमध्ये Google Toolbar आणि त्यानंतर Google Chrome डेव्हलपमेंटची जबाबदारी घेतली. Google Chrome आता सर्वाधिक पॉप्युलर इंटरनेट ब्राउजर आहे.

First published:

Tags: Google, Sundar Pichai, Tech news