मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

दिवाळीच्या मुहूर्तावर नवी Car घ्यायचा प्लान करताय?, मग जाणून घ्या लवकरच लॉन्च होणार आहेत या पाच कार

दिवाळीच्या मुहूर्तावर नवी Car घ्यायचा प्लान करताय?, मग जाणून घ्या लवकरच लॉन्च होणार आहेत या पाच कार

भारतीय बाजारपेठेत लवकरच नव्या कार दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या नव्या पाच कार्सविषयीची माहिती इथे प्रसिद्ध करत आहोत.

भारतीय बाजारपेठेत लवकरच नव्या कार दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या नव्या पाच कार्सविषयीची माहिती इथे प्रसिद्ध करत आहोत.

भारतीय बाजारपेठेत लवकरच नव्या कार दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या नव्या पाच कार्सविषयीची माहिती इथे प्रसिद्ध करत आहोत.

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर:  गेली दीड-दोन वर्षं कोरोनाच्या महामारीमुळे अक्षरशः वाया गेली. त्या साथीपाठोपाठ कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबलं नि दुष्टचक्र सुरू झालं. आता हळूहळू लसीकरण वेग पकडत असल्यामुळे कोरोना संसर्गाचं प्रमाण थोडं कमी होत असून, अर्थचक्र पुन्हा फिरू लागलं आहे. ते लवकरच सुरळीत होईल, असा अंदाज आहे. आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत नवा उत्साह संचारला आहे. ऑटोमोबाइल्स क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ऑटो सेक्टरमधली (Auto Sector) संभाव्य तेजी लक्षात घेऊन अनेक ऑटोमोबाइल कंपन्या आपली नवी मॉडेल्स बाजारात सादर करणार आहेत. त्यात टू-व्हीलर्स आणि फोर-व्हीलर्स अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. फोर व्हीलर उत्पादक कंपन्यांपैकी मारुती, महिंद्रा, टाटा अशा दिग्गज कंपन्यांसह जवळपास सर्वच महत्त्वाच्या कंपन्यांनी या वर्षीच्या दिवाळीच्या आधी नवी मॉडेल्स बाजारात दाखल करण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे.

भारतीय बाजारपेठेत लवकरच दाखल होण्याची अपेक्षा असलेल्या पाच कार्सविषयीची माहिती इथे प्रसिद्ध करत आहोत.

2022 मारुती सेलेरियो (2022 Maruti Celerio) : मारुती सुझुकी ही देशातली सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी लवकरच न्यू जनरेशन Celerio ही कार बाजारात सादर करण्याची घोषणा करू शकते. या कारच्या भारतातल्या रस्त्यांवर चाचण्या घेतल्या जात असल्याचं अनेकदा दिसलं आहे. त्यामुळे लवकरच ही कार बाजारात येण्याची शक्यता आहे. यात नव्या फीचर्ससह पूर्णतः नवं बाह्य डिझाइनचा समावेश आहे. ही कार सीएनजी इंधन पर्यायासह 1.2 लिटर पेट्रोल इंजिन पर्यायातही उपलब्ध होऊ शकेल.

हेही वाचा- आज Google चा वाढदिवस; जाणून घ्या का आणि कशी झाली गुगलच्या प्रवासाला सुरुवात

टाटा पंच (Tata Punch) : सफारी हे उत्तम मॉडेल देणाऱ्या टाटा कंपनीने भारतीय बाजारपेठेत पंच ही नवी मायक्रो एसयूव्ही सादर करणार असल्याची घोषणा आधीच केली आहे. हे पूर्णतः नवं मॉडेल असून, त्या माध्यमातून टाटा कंपनी मारुती इग्निस आणि महिंद्रा केयूव्ही 100 यांसारख्या कार्सना स्पर्धा निर्माण करणार आहे. येत्या काही आठवड्यांत या नव्या कारची किंमत आणि अन्य माहिती जाहीर केली जाण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा- दिवाळीआधी घरी आणा Mahindra XUV300, मिळेल 44 हजारांचा बेनिफिट आणि स्वस्त EMI ऑप्शन

एमजी अॅस्टर (MG Astor) : एमजी मोटर इंडिया या कंपनीची एमजी अॅस्टर ही नवी कार ह्युंडाई क्रेटा आणि किया सेल्टोस यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी लवकरच येते आहे. कंपनीने या कारची सर्व वैशिष्ट्यं आणि अन्य माहिती यापूर्वीच जाहीर केली आहे; मात्र किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. तीही येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

न्यू जनरेशन फोर्स गुरखा (New Gen Force Gurakha) : महिंद्राच्या थारशी स्पर्धा करण्यासाठी न्यू जेन फोर्स गुरखा हे मॉडेल 27 डिसेंबरला भारतीय बाजारपेठेत सादर केलं जाणार आहे. फोर्स कंपनीने 2021मधल्या अनेक नव्या घडामोडींसह आगामी नव्या मॉडेल्सबद्दलची माहिती यापूर्वीच जाहीर केली आहे.

हेही वाचा- 23 वर्षात 4 वेळा बदलली Google च्या वाढदिवसाची तारीख, वाचा काय आहे यामागची कहाणी

टोयोटा बेल्टा (Toyota Belta) : अशी अफवा आहे, की टोयोटा बेल्टा हे मारुती सियाजचं एक रिबॅज व्हर्जन असू शकतं. अर्थात, याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. ही कार या वर्षीच्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First published:

Tags: Car