मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google चं जबरदस्त फीचर, Driving करताना Speed Limit पार केल्यास Google Maps करेल अलर्ट

Google चं जबरदस्त फीचर, Driving करताना Speed Limit पार केल्यास Google Maps करेल अलर्ट

Google कडून Google Maps साठीचं Speed Limit Warning फीचर युजर्सला त्यांच्या चालू गाडीचा स्पीड सूचित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.

Google कडून Google Maps साठीचं Speed Limit Warning फीचर युजर्सला त्यांच्या चालू गाडीचा स्पीड सूचित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.

Google कडून Google Maps साठीचं Speed Limit Warning फीचर युजर्सला त्यांच्या चालू गाडीचा स्पीड सूचित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : Driving करताना काही गोष्टींचं पालन करणं अनिवार्य आहे. ड्रायव्हिंगवेळी रोड साइन्स लक्षात घेणं गरजेचं असतं. भारतात गाडी चालवताना स्पीड लिमिट (Speed Limit) पार करणं गुन्हा आहे आणि यासाठी दंड भरावा लागू शकतो. इतर देशातही हा दंडनीय गुन्हा आहे. कार चालवताना स्पीडोमीटर (Speedometer) आणि प्रत्येक रस्त्यावर स्पीड लिमिटनुसार ड्रायव्हिंग करणं महत्त्वाचं असतं. हे काम तुमच्या स्मार्टफोन आणि Google Maps चा वापर करुनही करता येतं. Google Maps द्वारे फोनवर स्पीड लिमिटसह इतर गोष्टींचीही माहिती मिळते.

Google कडून Google Maps साठीचं Speed Limit Warning फीचर युजर्सला त्यांच्या चालू गाडीचा स्पीड सूचित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. ड्रायव्हिंग करताना युजरचा स्पीड काय आहे हे फोन स्क्रिनवर या फीचरद्वारे दिसेल. यात युजरचं डेस्टिनेशन आणि इतर माहिती दिसते. एखाद्या चालकाने स्पीड लिमिट पार केल्यास, या फीचरद्वारे त्याला लगेच सतर्क केलं जातं.

पत्ता शोधण्यासाठी Google Maps ओपन केलं, कपलचं अश्लील कृत्य पाहून हादरली महिला

महत्त्वाची बाब म्हणजे Google Maps चं हे फीचर स्पीड लिमिट सांगत असलं, तरी त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. यातील डेटा चुकीचा किंवा जुना-आधीचा असू शकतो. त्यामुळे या फीचरवर पूर्णपणे निर्भर राहणं नुकसानकारकही ठरू शकतं. त्यामुळे चालकाने नियमानुसार योग्य त्या स्पीड लिमिटचं पालन करणं गरजेचं आहे.

Google Map द्वारे शोधा हरवलेला स्मार्टफोन; अशी होईल मदत

युजर या फीचरसाठी आधी लिस्ट तपासू शकतात, की त्यांचं क्षेत्र गुगलद्वारा निवडण्यात आलं आहे की नाही. ही लिस्ट वेळोवेळी अपडेट होत असते. हे फीचर काही देशांमध्ये सुरू करण्यात आलं आहे.

कसा कराल वापर?

- सर्वात आधी युजरकडे Google Maps चं लेटेस्ट वर्जन असणं गरजेचं आहे.

- Google Maps ओपन करुन, प्रोफाईल फोटोवर टॅप करुन Setting मध्ये जा.

- त्यानंतर Navigation वर क्लिक करा आणि स्क्रोल करुन ड्रायव्हिंग पर्यायवर जा.

- Speed Limit आणि Speedometer ऑन करा आणि Google Maps च्या मेन स्क्रिनवर परत जा.

- आता कार चालवताना Google Maps वर स्पीड चेक करू शकता.

First published:
top videos

    Tags: Google