नवी दिल्ली, 21 जुलै: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सरकारी सेवा ऑनलाईन रुपात लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी उमंग अॅपची (Umang App) सुविधा आणली आहे. डिजीटल इंडिया कार्यक्रम आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मॅप माय इंडियासह (Map my India) एक भागीदारी केली आहे. यामुळे आता उमंग अॅपमध्ये मॅपची सुविधादेखील मिळणार आहे.
उमंग अॅपमध्ये सरकारी सेवांसह इतरही गोष्टींची माहिती दिली जात असल्याने सर्वसामान्यासाठी हे अॅप महत्त्वाचं ठरतं आहे. मॅप माय इंडियासह सामंजस्य करारातून उमंग अॅपमध्ये मॅप सर्विस (Map Service) सक्षम केल्या आहेत. मॅप माय इंडियासह लिंक केल्यानंतर युजर्सला एका क्लिकवर आसपासच्या सरकारी सेवा, भाजी मार्केट, ब्लड बँक, ESIC रुग्णालयं यासारख्या अनेक गोष्टींची माहिती मिळेल.
या मॅप माय इंडियाद्वारे निर्मित भारतातील सर्वात रुंद आणि परस्पर रस्ते तसंच गाव पातळीवरही मॅप पाहता येईल. उमंग अॅप आणि मॅप माय इंडिया यांच्या माध्यमातून नेव्हिगेशनदरम्यान रहदारी आणि रस्ता सुरक्षा सतर्कता, ड्रायव्हिंग अंतर, दिशानिर्देशक, व्हिज्युअल मार्गदर्शनही नागरिक मिळवू शकतात.
To further enhance the initiatives of @_DigitalIndia and keeping in view the theme of ‘Aatmanirbhar Bharat’, @GoI_MeitY has enabled map services in @UmangOfficial_ through an MOU with @MapmyIndia. pic.twitter.com/VBhfWhh9y1
— UMANG App India (@UmangOfficial_) July 16, 2021
सरकारी सेवा -
umang.gov.in पोर्टलनुसार, हे सरकारी अॅप उमंग कस्टमरशी संबंधित सेवा आधार, ईपीएस, एनपीएस, डिजीलॉकर आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध करून देतो. या अॅपवरुन पीएफ अकाउंटशी आधार नंबर लिंकही करता येतो.
Umang App द्वारे युजर्स आधार, पॅन, पीएफ, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससह अनेक सुविधांचा फायदा घरबसल्या घेऊ शकतात. उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, पीएम आवाज योजना यासारख्या अनेक स्किमचा फायदाही घेता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Government apps, Tech news