नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल, शेअरिंगचे अनेक पर्याय मिळत असल्याने अनेक जण याचा वापर करतात. पण दोन फोन नंबर असतील आणि एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप वापरायचे असतील, तर एका ट्रिकद्वारे एका फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप अकाउंट (WhatsApp Account) वापरता येऊ शकतात.
फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप अकाउंट चालवण्यासाठी फोन सेटिंगमध्ये अॅप्लिकेशन आणि परमिशनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर अॅप क्लोन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावं लागेल.
या अॅप क्लोनमध्ये तुमच्या फोनमध्ये असलेले सर्व अॅप्स दिसतील. आता व्हॉट्सअॅपवर क्लिक करा आणि क्लोन अॅप पर्याय ऑन करा. त्यानंतर फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप इन्स्टॉल होतील.
जर फोन सेटिंगमध्ये क्लोन फीचर नसेल, तर सर्च बारमध्ये जावून क्लोन, डुअल अॅप किंवा ट्विन लिहून सर्च करू शकता. इथे क्लोन अॅप फीचर दिसेल. अनेक फोनमध्ये हा पर्याय नसतो.
फोनमध्ये क्लोन अॅप फीचर नसल्यास, गुगल प्ले स्टोरवरुन Parallel Space सारखे क्लोनिंग अॅप डाउनलोड करावे लागतील. हे अॅप क्लोन फीचरप्रमाणे काम करतात.
दरम्यान, RAM कमी असणाऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरताना स्टोरेज फुल होण्याची समस्या येते. त्यामुळे फोन हँग होतो. परंतु WhatsApp च्या एका फीचरच्या मदतीने फोनचं व्हॉट्सअॅप स्टोरेज आपोआप डिलीट केलं जाईल. त्यामुळे फोन हँग होण्याची समस्याही कमी होईल. डिसअपियरिंग मेसेज (Disappearing Message Feature) या फीचरमध्ये मेसेज रीड झाल्यानंतर सात दिवसांच्या आत आपोआप डिलीट होतो. पण कंपनी या फीचरमध्ये मेसेज 90 दिवसांपर्यंत ठेवण्याचा पर्याय टेस्ट करत आहे. हे फीचर सध्या अंडर डेव्हलपमेंट असून बीटा टेस्टर्ससाठीही उपलब्ध नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, WhatsApp chats, WhatsApp user