मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp वापरताना या चुका अजिबात करू नका, अन्यथा अडकाल मोठ्या समस्येत

WhatsApp वापरताना या चुका अजिबात करू नका, अन्यथा अडकाल मोठ्या समस्येत

 व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अनेकदा अनावधाने अशा काही चूका केल्या जातात, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते,

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अनेकदा अनावधाने अशा काही चूका केल्या जातात, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते,

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अनेकदा अनावधाने अशा काही चूका केल्या जातात, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते,

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फोटो, व्हिडीओ, मेसेज एकमेकांना पाठवले जातात. यात अनेकदा अनावधाने अशा काही चूका केल्या जातात, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते, कारवाई झाल्यास थेट जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.

पॉर्न व्हिडीओ -

पॉर्नबाबत अटी अतिशय कठोर आहेत. अशात जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर पॉर्न किंवा अश्लिल व्हिडीओ शेअर करताना पकडले गेलात, तर जेलची शिक्षा होऊ शकते. त्याशिवाय पोलीस पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलू शकतात. एवढंच नाही, तर अशा युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट कायमसाठी ब्लॉक केलं जाऊ शकतं.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन -

अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, परंतु टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा (Two Factor authentication) वापर करत नाहीत. यामुळे सिम स्वॅप करुन तुमच्या नंबरवरुन दुसऱ्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचा वापर करण्याचा धोका असतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करणं महत्त्वाचं ठरतं. यामुळे कोणीही तुमच्या नंबरवरुन व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकणार नाही. एखाद्याने तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचा चुकीचा वापर केल्यास, पोलीस थेट तुमच्यापर्यंत पोहचू शकतात.

WhatsApp चा एकच फॉन्ट वापरुन कंटाळा आला? चॅटिंगवेळी असा करा बदल

ऑटो बॅकअप -

अनेक युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप ऑटो बॅकअपवर (Auto Backup) असतं, जे कधीही असू नये. व्हॉट्सअ‍ॅप केवळ आपल्या प्लॅटफॉर्मवरच युजर्सच्या मेसेजच्या प्रायव्हसीची जबाबदारी घेतं. व्हॉट्सअ‍ॅप गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लॉउड सारख्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी घेत नाही. बॅकअप होताना तुमचं चॅट प्रायव्हेट राहत नाही.

Alert! फोनमधून डिलीट करा हे 8 Apps, Googleकडूनही बॅन; 4500 युजर्सला आर्थिक फटका

फॉरवर्ड -

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक प्रकारचे फॉरवर्ड मेसेज (Forword Message) येत असतात. कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी ती फेक न्यूज नाही ना, हे तपासणं गरजेचं आहे. अशा फॉरवर्डमध्ये अनेकदा ऑफर्सच्या फेक लिंक, फ्री ऑफर, फेक सरकारी योजनांसंबंधी लिंकही असतात. अशा लिंक फॉरवर्ड करू नयेत.

प्रोफाईल फोटो -

अनेकांना आपल्या व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईलमध्ये संपूर्ण माहिती टाकण्याची सवय असते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने असं करू नये. शक्यतो ग्रुप फोटोही प्रोफाईलवर ठेऊ नये प्रोफाईल फोटोच्या प्रायव्हसीसाठी तीन पर्याय मिळतात त्या सेटिंगमध्ये बदल करा आणि तुमचा प्रोफाईल फोटो तेच पाहू शकतात, ज्यांना तुम्ही दाखवू इच्छिता, अशी सेटिंग ठेवणं फायद्याचं ठरेल.

First published:
top videos

    Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp user