नवी दिल्ली, 29 मार्च : आधार कार्ड सरकारी तसंच इतर अनेक कामांसाठी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. Aadhaar Card एक असा 12 अंकी नंबर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जो भारत सरकारकडून दिला जातो. आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास ही प्रक्रिया आता सोपी झाली आहे. आधार अपडेट करणं केवळ फायद्याचंच नाही, तर अनेक ऑनलाईन सेवांसाठी आवश्यकही आहे. आधारसंबंधी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल नंबर UIDAI सह रजिस्टर करावा लागतो, ज्याचा वापर OTP द्वारे ऑथेंटिकेशनसाठी केला जातो. आधार कार्डवरचा मोबाईल नंबर जर बदलायचा असेल, तर काही सोप्या स्टेप्सने हे काम करता येऊ शकतं.
OTP द्वारे मोबाईल नंबर अपडेट करा -
- सर्वात आधी आधारच्या अधिकृत पोर्टल https://ask.uidai.gov.in/ वर जावं लागेल.
- तुमचा मोबाईल नंबर आणि Captcha च्या मदतीने लॉगइन करा. संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
- OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि सबमिट OTP वर क्लिक करा.
- पुढच्या पेजवर आधार सर्विसेज न्यू एनरोलमेंट आणि अपडेट आधार असा पर्याय येईल, येथे अपडेट आधारवर क्लिक करा.
- ‘what do you want to update’ सेक्शनमध्ये मोबाईल नंबर निवडा.
- आणखी एक पेज ओपन होईल येथे मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड विचारला जाईल. सर्व माहिती भरा आणि Send OTP वर क्लिक करा. OTP एंटर करा आणि वेरिफाय केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करा.
- सर्व डिटेल्स चेक करुन सबमिट बटणवर क्लिक करा.
- त्यानंतर अपॉइंटमेंट ID सह स्क्रिनवर Book Appointment पर्यायावर क्लिक करा आणि आधार एनरोलमेंट सेंटरवर स्लॉट बुक करा.
विना OTP मोबाईल नंबर कसा अपडेट कराल?
- यासाठी आधार एनरोलमेंट अपडेट सेंटरवर जावं लागेल.
- आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल.
- सध्याचा मोबाईल नंबर फॉर्मवर भरा, जुना मोबाईल नंबर लिहिण्याची आवश्यकता नाही.
- एक्झुक्यूटिव्ह रिक्वेस्ट रजिस्टर करेल.
- त्यानंतर एक अॅक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल, ज्यावर URN अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल.
- या सर्विससाठी 25 रुपये द्यावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, M aadhar card