मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /PAN Card घरबसल्या करा अपडेट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

PAN Card घरबसल्या करा अपडेट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

पॅन कार्डमध्ये एखादी चूक असल्यास किंवा माहिती अपडेट करायची असल्यास, घरबसल्या ऑनलाईन हे काम सहजपणे करता येऊ शकतं.

पॅन कार्डमध्ये एखादी चूक असल्यास किंवा माहिती अपडेट करायची असल्यास, घरबसल्या ऑनलाईन हे काम सहजपणे करता येऊ शकतं.

पॅन कार्डमध्ये एखादी चूक असल्यास किंवा माहिती अपडेट करायची असल्यास, घरबसल्या ऑनलाईन हे काम सहजपणे करता येऊ शकतं.

नवी दिल्ली, 9 मे : आयटी रिटर्न भरणं, बँक अकाउंट ओपन करणं या आणि अशा अनेक कामांसाठी पॅन कार्डची गरज लागते. पॅन कार्ड सरकारीसह अनेर खासगी कामांसाठीही महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. परंतु पॅन कार्डमध्ये एखादी चूक असल्यास किंवा माहिती अपडेट करायची असल्यास, घरबसल्या ऑनलाईन हे काम सहजपणे करता येऊ शकतं.

पॅन कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. परंतु ही कॉपी घरी मागवायची असल्यास, यासाठी 107 रुपये भरावे लागतात.

कसं कराल ऑनलाईन अपडेट -

- सर्वात आधी NSDL च्या https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html वेबसाईटवर जावं लागे.

- यात Application Type मध्ये Changes or Correction in existing PAN Data/ Reprint of PAN Card वर क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर मागितलेली आवश्यक माहिती भरावी लागेल आणि सबमिटवर क्लिक करावं लागेल.

- तसंच मागितलेले सर्व डॉक्युमेंट अपलोडही करावे लागतील.

(वाचा - PAN Card वरील स्वतःचा फोटो कसा बदलायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...)

e-pan card -

ज्यांच्याकडे अजूनही पॅन कार्ड नाही, ते या ऑनलाईन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाईटवर जाऊन, तेथे Instant PAN through Aadhaar New लिंकवर क्लिक करा. त्यानंतर दोन ऑप्शन ओपन होतील, त्यापैकी Get New PAN वर क्लिक करा.

त्यानंतर आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड भरा. आधार कार्ड रजिस्टर असलेल्या फोन नंबरवर OTP येईल. OTP आधार कार्डच्या सत्यतेची पडताळणी करेल. त्यानंतर लगेच e-pan मिळेल. ते डाऊनलोड करा. या पॅन कार्डची कॉपी हवी असल्यास, 50 रुपयांत e-pan ची प्रिंट काढता येते.

First published:
top videos

    Tags: Pan card, Pan card online, Tech news