नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : Aadhaar Card प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सर्वच सरकारी कामांसह खासगी कामांसाठीही आधार कार्डची आवश्यकता असते. महत्त्वाची बाब म्हणजे कुठेही ओळखपत्र देताना आधार कार्डवरील माहिती इतर कागदपत्रांशी जुळणंही तितकंच गरजेचं असतं. जर इतर कागदपत्रांवरील माहिती आधार कार्डशी जुळली नाही, तर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच आधार कार्ड अपडेट असणं महत्त्वाचं आहे.
बँक, फायनेंशियल वर्क, सब्सिडीसाठी आधार कार्डची गरज पडते. अशात जर तुमच्या घराचा पत्ता चुकीचा असेल, घर बदललं असेल, तर इतर कागदपत्रांवरही अॅड्रेस बदलणं गरजेचं आहे. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आधार कार्डमध्ये सोप्या पद्धतीने अॅड्रेस अपडेट करता येऊ शकतो.
Aadhaar Card Update Process -
- UIDAI लिंक ssup.uidai.gov.in/ssup/ वर लॉगइन करा.
- त्यानंतर Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा.
- आता 12 अंकी UID नंबर टाका
- त्यानंतर कॅप्चा कोड किंवा सिक्योरिटी कोड टाका.
- आता Send OTP वर क्लिक करा.
- इथे आधार कार्डसोबत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. OTP टाकून लॉगइनवर क्लिक करा.
- इथे आधार कार्ड डिटेल्स दिसतील. इथे सांगितलेल्या 32 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल. तुमच्याकडे असलेलं डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर अॅड्रेस अपडेट केला जाईल.
UIDAI ने घराच्या पत्त्यासाठी या कागदपत्रांना दिली मान्यता -
– बँक स्टेटमेंट/ पासबुक
– पासपोर्ट
– पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट/ पासबुक
– रेशन कार्ड
– मतदार ओळखपत्र
– ड्राइव्हिंग लाइसन्स
– सरकारी फोटो आयडी कार्ड
– विज बील
– पाणी बील
– टेलिफोन लँडलाइन बिल
– प्रोपर्टी टॅक्स रिसीट
– क्रेडिट कार्ड स्टेटमेंट
– विमा पॉलिसी
– रजिस्टर्ड कंपनीच्या लेटरहेडवर फोटोसह कागदपत्र
– मनरेगा जॉब कार्ड
– पेंशनर कार्ड
– फ्रीडम फाइटर कार्ड
– शेतकरी पासबुक
अशाप्रकारे UIDAI ने 21 प्रकारच्या कागदपत्रांना घराच्या अॅड्रेससाठी प्रमाणपत्र रुपात मान्यता दिली आहे. या लिंकवरही तुम्ही हे कागदपत्र तपासू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, M aadhar card