मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp Payment द्वारे असे ट्रान्सफर करा पैसे, पाहा सोपी प्रोसेस

WhatsApp Payment द्वारे असे ट्रान्सफर करा पैसे, पाहा सोपी प्रोसेस

WhatsApp Pay फीचरचा वापर करुन एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा सोपा पर्याय आहे.

WhatsApp Pay फीचरचा वापर करुन एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा सोपा पर्याय आहे.

WhatsApp Pay फीचरचा वापर करुन एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा सोपा पर्याय आहे.

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. देशात WhatsApp चे 50 कोटीहून अधिक युजर्स आहेत. WhatsApp मागील कित्येक दिवसांपासून अनेक नवे अपडेट्स देत आहे. त्यापैकी ऑनलाइन WhatsApp Payment फीचर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आलं. WhatsApp Pay फीचरचा वापर करुन एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा सोपा पर्याय आहे.

WhatsApp चं नवं Update, आता Voice Message बाबत मिळणार ही नवी सुविधा

WhatsApp वर कसे ट्रान्सफर कराल पैसे?

- सर्वात आधी WhatsApp ओपन करा

- आता मेन्यू बटण सिलेक्ट करा.

- स्क्रिनवर अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी Payment पर्यायावर क्लिक करा.

- आता बँक अकाउंट WhatsApp सह Add करावं लागेल.

- बँक अकाउंट Add केल्यानंतर New Payment सिलेक्ट करावं लागेल.

- आता अनेक कॉन्टॅक्ट लिस्ट दिसतील. त्यापैकी ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा.

- रक्कम टाका आणि Send Payment वर क्लिक करा.

- आता UPI PIN टाकून WhatsApp Pay प्रक्रिया पूर्ण होईल.

Alert! तुम्हालाही WhatsApp वर KBC चा मेसेज आलाय? रिप्लाय देण्याची घाई नको आधी हे वाचा

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने फक्त मेसेजच नाही तर ऑडिओ (Audio), व्हिडिओ (Video) आणि फोटोदेखील (Photos) अगदी सहजपणे पाठवता येतात. आपल्या युजर्सना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न कंपनी करत असते. काही महिन्यांपूर्वी कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपच्या सहाय्याने पैसे पाठवण्याचं फीचरही सुरू केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटच्याबाबतीत (WhatsApp Payment) कंपनीनं आता एक मोठी घोषणा केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला (WhatsApp Users) त्या त्या देशांच्या चलनांसोबतच आता क्रिप्टोकरन्सीदेखील ट्रान्सफर (Transfer cryptocurrency using WhatsApp) करता येणार आहे. सध्या फक्त अमेरिकेतील युजर्ससाठी हे फीचर देण्यात आलं आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Tech news, WhatsApp features, Whatsapp News, Whatsapp pay, WhatsApp user