Home /News /technology /

Alert! तुम्हालाही WhatsApp वर KBC चा मेसेज आलाय? रिप्लाय देण्याची घाई नको आधी हे वाचा

Alert! तुम्हालाही WhatsApp वर KBC चा मेसेज आलाय? रिप्लाय देण्याची घाई नको आधी हे वाचा

भारतातल्या काही निवडक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना 'कौन बनेगा करोडपती'च्या (KBC) नावाखाली फसवणूक करणारे मेसेजेस येत आहेत. केबीसी सिमकार्ड लकी ड्रॉ कॉम्पिटिशन 2021 साठी रजिस्टर्ड नंबर निवडला गेला आहे, असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं.

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : भारतातल्या काही निवडक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना 'कौन बनेगा करोडपती'च्या (KBC) नावाखाली फसवणूक करणारे मेसेजेस येत आहेत. केबीसी सिमकार्ड लकी ड्रॉ कॉम्पिटिशन 2021 साठी रजिस्टर्ड नंबर निवडला गेला आहे, असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. तसंच, रोख पारितोषिक मिळवण्यासाठी (Cash Reward) युजर्सनी दिलेल्या लिंकवर क्लिक करणं आवश्यक असतं. ती लिंक युजर्सना कथित 'KBC Office'वर नेते. हा मेसेज फसवणूक करणारा असून, याच वर्षी आधीही एकदा असाच एक मेसेज व्हायरल (Fraud Message Viral) झाला होता. तो मेसेज खोटा असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम (Cyber Crime) युनिटने या संदर्भात माहिती देणारी एक सविस्तर ब्लॉग पोस्ट प्रसिद्ध केली होती आणि तक्रार कशी करावी, याची माहितीही दिली होती. 2021 च्या सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान व्हायरल झालेल्या मेसेजपेक्षा आत्ताचा नवा मेसेज थोडा वेगळा आहे. पूर्वीच्या मेसेजमध्ये केबीसी होस्ट अमिताभ बच्चन आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा फोटो होता. तसंच, कथित केबीसी ऑफिसचा आताच्या मेसेजमध्ये दिलेला पत्ता पूर्वीच्या मेसेजमधल्या पत्त्यापेक्षा वेगळा आहे. हे मेसेजेस खोटे आहेत. सर्वांच्या माहितीसाठी हा मेसेज येथे देत आहोत. “HELLO Namashkar! I am vijay Kumar from KBC Koun Banega Carorepati mumbai! Congratulation, Your wahtsapp Number Selected in KBC Sim Card Lucky Draw Compitation 2021! You have won 25,00,000 Lacs KBC Cash Prize. Apka WAHTSAPP Number KBC All india Sim Card Lucky Draw Compitation Main Winner Bangaya hai! 25,000,00 Lacs KBC Cash Prize Ka! Please Contact Now KBC Office WhatsApp No: https://api.whatsapp.com/send?phone=917011789860 KBC Manger:Mr rana prtabh singh is Online And get your KBC Prize Money information! Your Lottery No.0099 Your KBC File No:BT12 Dear winner please only call to WhatsApp! Ap abi apne WhatsApp Number se KBC Office Me Whatsapp Call karein! https://api.whatsapp.com/send?phone=917011789860 Thank" दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी माहिती दिली आहे, की अशा प्रकारे मेसेजेस पाठवणारे घोटाळेबाज मेसेज पाठवताना भारतीय क्रमांकावरूनच पाठवतात. म्हणजेच त्या क्रमांकाचा आयएसडी कोड +91 असतो, त्या मेसेजमध्ये दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप लिंक मात्र बहुतांश वेळा पाकिस्तानमधल्या क्रमांकाच्या म्हणजेच +92 ने सुरू होणाऱ्या असतात.

आता WhatsApp आणखी सुरक्षित होणार, या नव्या फीचरमुळे असा होणार बदल

या आकर्षक मेसेजला बळी पडून काही जण त्या लिंकवर क्लिक करून पुढे जे काही सांगितलं जाईल, तसं करतात. पैसे भरायला सांगितलं जातं. तसंच एकेक मागण्या वाढत जातात आणि संपर्कासाठी केवळ व्हॉट्सअ‍ॅपच वापरण्याचा आग्रह पलीकडच्या बाजूकडून धरला जातो. त्यांना वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे भरण्यास सांगितलं जातं. तसंच, बक्षिसाची रक्कम 45 लाख, 75 लाख वगैरे अशी वाढल्याचं सांगितलं जातं. युजर्सचा त्यावर विश्वास बसतो आणि ते थोडेथोडे पैसे भरत राहतात. असं काही आठवडे किंवा काही महिन्यांपर्यंत चालू शकतं. नंतर जेव्हा युजर्सना फसवणुकीची शंका येते, तेव्हा ते आधी बक्षिसाची रक्कम देण्यास सांगतात आणि तोपर्यंत पुढची रक्कम भरणार नसल्याचं सांगतात. त्यानंतर समोरच्या बाजूकडून संपर्क तोडला जातो आणि यासाठी वापरलेले व्हॉट्सअ‍ॅप नंबर्स बंद केले जातात, अशी माहिती दिल्ली सायबर पोलिसांनी दिली आहे.

Alert! सरकारने कर्ज देणाऱ्या 600 हून अधिक Apps बाबत दिला सावधानतेचा इशारा

अशा प्रकारचे रोख बक्षीस देण्याचा दावा करणारे मेसेजेस खोटे असतात. तसंच, त्यात व्याकरणदृष्ट्या बऱ्याच चुका असतात. त्यावरून हे मेसेजेस खोटे आहेत हे ओळखता येऊ शकतं. त्यामुळे युजर्सनी अशा अफवांना बळी पडू नये. अशा प्रकारच्या कोणत्याही संवादात जर वैयक्तिक माहिती खुली करण्याचा आग्रह केला जात असेल, तर सावध व्हावं. युजर्सना असा काही मेसेज आला, तर स्क्रीनशॉट काढून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
First published:

Tags: Online fraud, Tech news, WhatsApp user

पुढील बातम्या