मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

या पद्धतीने सुरक्षित करा आपलं आधार कार्ड; कोणीही करू शकणार नाही गैरवापर

या पद्धतीने सुरक्षित करा आपलं आधार कार्ड; कोणीही करू शकणार नाही गैरवापर

``आधार युजर्सनं काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही,`` असं मत डाटा सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आधार सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत, हे जाणून घेऊ या.

``आधार युजर्सनं काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही,`` असं मत डाटा सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आधार सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत, हे जाणून घेऊ या.

``आधार युजर्सनं काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही,`` असं मत डाटा सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आधार सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत, हे जाणून घेऊ या.

नवी दिल्ली 31 मे : आधार कार्डच्या (Aadhar Card) डाटा (Data) सुरक्षेबाबत देशात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. `यूआयडीएआय`ने (UIDAI) 27 मे रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानंतर हा वाद सुरू झाला आहे. आधार कार्ड युजर्सनं त्यांच्या आधार कार्डची फोटोकॉपी (Photocopy) कोणत्याही संस्थेला देऊ नये. तसंच असं केल्यास तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो, असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मात्र वाद निर्माण झाल्यामुळे `यूआयडीएआय`नं हा सल्ला मागे घेतला आहे. पण यामुळे आधारच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ``आधार युजर्सचा डाटा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि हा डाटा सुरक्षित राहण्यासाठी मजबूत व्यवस्था करण्यात आली आहे,`` असा दावा `यूआयडीएआय`नं केला आहे. ``आधार युजर्सनं काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही,`` असं मत डाटा सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आधार सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत, हे जाणून घेऊ या. आधार फ्रॉड टाळण्यासाठी आलं आहे Masked Aadhaar! असं करा दोन मिनिटांत डाउनलोड टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) आधार कार्ड तुमच्या मोबाईल क्रमांक (Mobile Number) आणि ईमेलशी लिंक करणं हा आधारचा गैरवापर रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. असं केल्यानं तुमच्या आधार कार्डच्या पडताळणीसाठी ओटीपी (OTP) आवश्यक असेल, आणि तो तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमाकांवरच येईल. ओटीपीशिवाय आधारची पडताळणी करता येणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आधारचा गैरवापर करायचा प्रयत्न केला तरी ओटीपी नसल्यामुळे त्याचा हेतू यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केलेला असणं आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक बदलला असेल तर नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करावा. मास्क्ड आधार प्रत (Masked Aadhar Copy) जर तुम्हाला कुठे आधार कार्डाची फोटोकॉपी देणं गरजेचं असेल तर अशावेळी मास्क्ड आधार कार्डची फोटोकॉपी द्यावी. मास्क्ड आधार कार्डमध्ये तुमच्या संपूर्ण आधार क्रमांकाऐवजी त्यातले फक्त शेवटचे चार अंक दिसतात. या चार अंकांच्या मदतीनं तुमची आधार पडताळणी होईल, तसंच तुमचा संपूर्ण आधार क्रमांक दर्शवला न गेल्याने कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. तुम्ही `यूआयडीएआय`च्या अधिकृत वेबसाईटवरून मास्क्ड आधार डाउनलोड करू शकता. सरकार बॅकफूटवर; या कारणामुळे आधारकार्डची झेरॉक्स न देण्याबाबतचा सल्ला मागे बायोमेट्रिक्स करा लॉक तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक (Biometrics Lock) करून तुमचं आधार कार्ड सुरक्षित करू शकता. बायोमेट्रिक्स लॉक करणं म्हणजे तुमचा अंगठा, बोटांचे ठसे आणि डोळ्यांतील बुबुळाचे स्कॅनिंग तुमच्या इच्छेविरुद्ध किंवा परवानगीशिवाय कोणीही वापरू शकणार नाही. तुम्ही `यूआयडीएआय`च्या वेबसाईटवर जाऊन तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता. बायोमेट्रिक्स लॉक केल्यानंतर ओटीपी आधारित ऑथेंटिकेशन सुरूच राहतं. तुम्ही बायोमेट्रिक्स तात्पुरते किंवा कायमस्वरूपी लॉक करू शकता. व्हर्च्युअल आयडेंटिटीचा वापर व्हर्च्युअल आयडेंटिटीमध्ये (Virtual Identity) आधार क्रमांक लपवला जातो आणि तात्पुरता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी तयार केला जातो. यामध्ये युजर्सच्या आधार क्रमांकाचा उल्लेख नसला तरी त्याची ओळख प्रमाणित केली जाते. व्हीआयडी (VID) ही सुविधा मर्यादित काळापुरतीच वैध असते. नवीन व्हीआयडी तयार केल्यानंतर, जुना व्हीआयडी आपोआप संपुष्टात येतो. आधार पोर्टलद्वारे किंवा एम-आधारच्या मदतीनं व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार केली जाऊ शकते. या पद्धतींनी तुम्ही तुमचं आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता.
First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link

पुढील बातम्या