जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Corona Caller Tune चा वैताग आलाय? फक्त एका मेसेजने बंद करा तो आवाज

Corona Caller Tune चा वैताग आलाय? फक्त एका मेसेजने बंद करा तो आवाज

Corona Caller Tune चा वैताग आलाय? फक्त एका मेसेजने बंद करा तो आवाज

कोरोना काळात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोबाईलवर Corona Caller Tune ऐकू येत होती. याचदरम्यान अनेक जण ही कॉलर ट्यून बंद करण्याबाबतही चर्चा करत आहेत. एका ट्रिकद्वारे ही ट्यून बंद करता येऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : मागील दीड वर्षापासून देशात कोरोनाची परिस्थिती आहे. सरकारकडून कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय, त्यानंतर लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. फोनवरुनही कॉलर ट्यूनच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली जात आहे. एखाद्याला फोन केल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून कोरोनाची कॉलर ट्यून, लसीकरणाबाबतची कॉलर ट्यून ऐकू येते. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनही होती. ती काही दिवसांनी हटवण्यात आली. कोरोना काळात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोबाईलवर Corona Caller Tune ऐकू येत होती. याचदरम्यान अनेक जण ही कॉलर ट्यून बंद करण्याबाबतही चर्चा करत आहेत. एका ट्रिकद्वारे ही ट्यून बंद करता येऊ शकते. BSNL - बीएसएनएल (BSNL) चे प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्स कोरोना व्हायरस ट्यून मोबाईलवर बंद करू शकतात. त्यासाठी UNSUB टाईप करुन 56700 या किंवा 56799 वर मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल. Jio - जिओ (Jio Users) युजर्स आपल्या फोनवरुन STOP लिहून 155223 वर मेसेज करु शकतात. कन्फर्मेशननंतर कॉलर ट्यून बंद होईल.

SMS,मेल,सोशल मीडिया..कसाही होऊ शकतो Online Fraud,बचावासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Airtel - एअरटेलवर (Airtel) 144 वर CANCT टाईप करुन मेसेज पाठवून कॉलर ट्यून बंद करता येईल. त्यानंतर मोबाईलवर एक मेसेजही येईल. त्याशिवाय, एखाद्याला फोन करताना नंबर डायल करावा लागेल. त्यानंतर कोरोना व्हायरस अलर्ट मेसेजची सुरुवात होईल, त्यावेळी 1 प्रेस करावं लागेल. 1 प्रेस केल्यानंतर कॉलर ट्यून बंद होईल आणि नॉर्मल ट्यून ऐकू येईल. कोरोना कॉलर ट्यूनसाठी बिग बींचा आवाज देण्यात ऐकू येत होता. त्यानंतर प्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला (Jasleen Bhalla) यांच्या आवाजात कोरोनाचा नवा संदेश ऐकू येत आहे. जसलीन भल्ला व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट होण्याआधी जसलीन भल्ला एका चॅनेलमध्ये स्पोर्ट्स जनर्लिस्ट होत्या. परंतु गेल्या 10 वर्षांपासून त्या पूर्णपणे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांनी अनेक जाहिरातींना आपला आवाज दिला आहे. यापूर्वी दिल्ली मेट्रो, डोकोमो, हॉर्लिक्स, स्लाईस मँगो ड्रिंकच्या जाहिरातीसाठी त्यांनी आवाज दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात