नवी दिल्ली, 20 जुलै: रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी अधिकतर लोक IRCTC चा वापर करतात. तिकीटाचं पेमेंट करण्यासाठी IRCTC अनेक पर्याय देतं. या पर्यायांमध्ये काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसी ई-वॉलेटचा (IRCTC e-Wallet) पर्याय जोडण्यात आला आहे. IRCTC e-Wallet असं सिस्टम आहे, ज्यात अॅडव्हान्समध्ये पैसे जमा करू शकतो आणि तिकीट बुकिंग वेळी सहजपणे पेमेंट करता येतं.
- IRCTC e-Wallet द्वारे तिकीट बुक करण्यासाठी सर्वात आधी IRCTC आयडी लॉगइन करावं लागेल.
- त्यानंतर डिस्टिनेशन सिलेक्ट करुन, तारीख सिलेक्ट करावी लागेल.
- आता तिकीटासाठीचा पर्याय सिलेक्ट करा आणि Book Now वर क्लिक करा. डिटेल्स रिव्ह्यू करुन कॅप्चा कोड टाका. त्यानंतर पेमेंटवर पर्यायावर क्लिक करा.
- इथे पेमेंट गेटवेमध्ये IRCTC ई-वॉलेटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ट्रान्झेक्शन पासवर्ड टाकावा लागेल.
- इथे कन्फर्मेशन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल आणि ई-वॉलेटमधून पेमेंट होईल.
Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, अशाप्रकारे मिळवता येईल परत
IRCTC e-Wallet मध्ये कसे टाकाल पैसे?
- e-Wallet बनवण्यासाठी सर्वात आधी IRCTC वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर आपल्या आयडीने लॉगइन करा आणि IRCTC e-Wallet वर टॅप करा.
- इथे IRCTC e-Wallet Register Now पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
WhatsApp Chat आता आणखी सुरक्षित होणार; पाहा तुमच्यावर कसा परिणाम होणार
- नवी विंडो ओपन होईल, त्यात पॅन कार्ड आणि आधार कार्ड डिटेल्स मागितले जातील. इथे संपूर्ण माहिती भरावी लागेल. 50 रुपये रजिस्ट्रेशन फी द्यावी लागेल. त्यानंतर बँकेशी ई-वॉलेट लिंक होईल. या वॉलेटमध्ये 100 ते 1000 रुपये ठेवता येऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, एकदा ई-वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर ते पुन्हा बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता येणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IRCTC, Online payments