Home /News /technology /

WhatsApp पेमेंटचा UPI पिन विसरलाय? जाणून घ्या रीसेट करण्याची सोपी प्रक्रिया

WhatsApp पेमेंटचा UPI पिन विसरलाय? जाणून घ्या रीसेट करण्याची सोपी प्रक्रिया

तुमच्याकडे बँक अकाउंटचा यूपीआय पिन असेल, तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन यूपीआय पिन तयार करण्याची गरज नाही. तुम्ही यूपीआय पिन विसरला असाल, तर तुमच्याकडे तो रीसेट करण्याचा पर्यायदेखील असतो

नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) वापर करून पेमेंट किंवा पैसे ट्रान्स्फर (Transfer Money) करू शकता. होय, युझर्स व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा (WhatsApp Payments) वापर करून पैसे ट्रान्स्फर करू शकतात. तुम्ही तुमचं बँक अकाउंट व्हॉट्सअ‍ॅपशी लिंक करून यूपीआय (UPI) पेमेंट करू शकता. तुमच्याकडे स्कॅनर, मोबाइल नंबर, यूपीआय आयडी यांपैकी एकच माहिती असली, तरीही तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करता येतात. यूपीआय म्हणजे काय? युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (Unified Payments Interface) ही तुम्हाला घरबसल्या सहज पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा देणारी व्यवस्था आहे. यासाठी तुमच्याकडे पेटीएम, व्हॉट्सअ‍ॅप, फोनपे, भीम, गुगल पे आदी यूपीआयला सपोर्ट करणाऱ्या अ‍ॅप्सपैकी एखादं अ‍ॅप असणं आवश्यक असतं. यूपीआयद्वारे तुम्ही एक बँक अकाउंट विविध यूपीआय अ‍ॅप्सशी लिंक करू शकता. तसंच एकाच यूपीआय अ‍ॅपद्वारे अनेक बँक अकाउंट ऑपरेट केली जाऊ शकतात. Dark Web: गुन्हेगारांचा अड्डा असलेल्या 'डार्क वेब'बद्दल तुम्हाला माहिती आहे का? यूपीआय पिन किती अंकाचा असतो? यूपीआय पिन हा 4 किंवा 6 अंकी क्रमांक असतो. तो पेमेंट पूर्ण करण्यासाठी देणं आवश्यक असतं. तुमच्याकडे बँक अकाउंटचा यूपीआय पिन असेल, तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन यूपीआय पिन तयार करण्याची गरज नाही. तुम्ही यूपीआय पिन विसरला असाल, तर तुमच्याकडे तो रीसेट करण्याचा पर्यायदेखील असतो. म्हणजेच तुम्हाला नवीन पिन तयार करता येतो. अँड्रॉइड युझर्स व्हॉट्सअ‍ॅपवर असा करू शकतील यूपीआय पिन रीसेट - तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. - More ऑप्शनवर क्लिक करा. हा ऑप्शन तुम्हाला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन डॉटमध्ये सापडेल. त्यानंतर Payments वर क्लिक करा. - आता बँक अकाउंट सिलेक्ट करा. - त्यानंतर Change UPI PIN किंवा Forgot UPI PIN वर क्लिक करा. - तुम्ही Forgot UPI PIN वर क्लिक करत असाल तर Continue वर क्लिक करा. डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक आणि एक्सपायरी डेट टाका. काही बँका तुम्हाला डेबिट कार्डचा CVV देखील विचारू शकतात. - Change UPI PIN वर क्लिक केल्यास सध्याचा यूपीआय पिन टाका. त्यानंतर नवीन यूपीआय पिन टाकून तो पुन्‍हा कन्फर्म करा.

चार अंकीच का असतो ATM PIN? हे आहे त्यामागचं कारण; जाणून घ्या

आयफोन युझर्स व्हॉट्सअ‍ॅपवर असा करू शकतील यूपीआय पिन रीसेट - तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. - Setting ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Payments वर क्लिक करा. - आता बँक अकाउंट सिलेक्ट करा. - त्यानंतर Change UPI PIN किंवा Forgot UPI PIN वर क्लिक करा. - Forgot UPI PIN वर क्लिक करत असाल तर Continue वर क्लिक करा. डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक आणि एक्सपायरी डेट टाका. काही बँका तुम्हाला डेबिट कार्डचा CVV देखील विचारू शकतात. - Change UPI PIN वर क्लिक केल्यानंतर सध्याचा यूपीआय पिन टाका. त्यानंतर नवीन यूपीआय पिन टाकून तो पुन्‍हा कन्फर्म करा. विविध अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट करणं, पैसे ट्रान्स्फर करणं हे दिवसेंदिवस वाढत आहे. याला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम अशा तंत्रज्ञानाद्वारे केलं जात आहे.
First published:

Tags: Online payments, Tech news, Upi, WhatsApp features

पुढील बातम्या