Home /News /technology /

Dark Web: गुन्हेगारांचा अड्डा असलेल्या 'डार्क वेब'बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Dark Web: गुन्हेगारांचा अड्डा असलेल्या 'डार्क वेब'बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

कोविड महामारीनंतर इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. इंटरनेटच्या मदतीने वर्क फ्रॉम होम ते ऑनलाइन अभ्यास अशी अनेक कामे सहज केली जातात. मात्र, यामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आपण जेवढे इंटरनेट वापरतो, ते या आभासी जगात फक्त 5 ते 10 टक्के आहे. इंटरनेटचे एक मोठे जग आहे, या मोठ्या भागात आपण पोहोचू शकत नाही, त्या जगाला डार्क वेब (Dark Web) म्हणतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 फेब्रुवारी : सध्या माहिती-तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा (Social Media) बोलबाला आहे. जवळपास प्रत्येक व्यक्तीचं एखाद्या तरी सोशल मीडिया साइटवर अकाउंट असेलच. काही जणांना तर सोशल मीडियाची इतकी आवड आहे, की दिवसभरात आपण काय-काय केलं याचे अपडेट्सदेखील ते सोशल मीडियावर देतात. याशिवाय कोविड महामारीमुळेही (Corona Pendemic) इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. एकूणच काय, तर सध्या इंटरनेट ही आपल्या दैनंदिन गरजेची बाब ठरत आहे; मात्र आपण जेवढं इंटरनेट वापरतो, ते या आभासी जगाच्या (Virtual World) फक्त 5 ते 10 टक्के आहे. आपल्याला माहिती नसलेल्या इंटरनेटची व्याप्ती खूप मोठी आहे. त्या भागापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्या भागाला डार्क वेब (Dark Web) म्हणतात. डार्क वेब ही एक अशी जागा आहे, जिथे ड्रग्ज, शस्त्रं, अंडरवर्ल्ड, हॅकिंग (Hacking) आणि इतर बेकायदेशीर गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर होतो. आपण वेबचा जो भाग वापरतो त्याला सरफेस वेब (Surface Web) असं म्हणतात. सरफेस वेबच्या तुलनेत डार्क वेब ही पूर्णपणे भिन्न संकल्पना आहे. डार्क वेबमध्ये कोणतंही कंटेंट रेग्युलेशन (Content Regulation) होत नाही. डार्क वेब हा वेबचा एक असा भाग आहे, ज्यामध्ये प्रत्येक जण प्रवेश करू शकत नाही. डार्क वेबमध्ये प्रवेश करण्यासाठी काही स्पेशल परमिशन्सची (Special Permissions) आवश्यकता असते. याच्या मदतीनं सर्वसामान्यांची फसवणूक करून अनेक प्रकारचे काळे धंदे केले जातात. जगभरात घडणाऱ्या बेकायदेशीर आणि चुकीच्या कृत्यांचं नियोजन डार्क वेबमध्ये केलं जातं, असं मानलं जातं. त्यामुळे गुन्हेगारी जगतातल्या (Criminal World) व्यक्ती याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. डार्क वेबच्या मदतीनं व्यक्तींची खासगी माहिती मिळवली जाते व त्याआधारे त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. काही प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल (Blackmail) करून त्यांच्याकडून खंडणी (Ransom) वसूल करण्यासाठीदेखील डार्क वेबची मदत घेतली जाते. चार अंकीच का असतो ATM PIN? हे आहे त्यामागचं कारण; जाणून घ्या डार्क वेबचा वापर प्रामुख्याने वाईट कारणांसाठी होत असला, तरी काही जण त्याचा चांगल्या कारणांसाठीही उपयोग करतात. जगभरातले व्हिसलब्लोअर्सदेखील (Whistleblowers) डार्क वेबचा वापर करतात. सरकारी-कॉर्पोरेट घोटाळे उघड करण्यासाठी शोध पत्रकारसुद्धा (Investigative journalist) याचा वापर करतात. प्रामुख्याने गुन्हेगारीसाठी वापर होऊनही डार्क वेब वापरणं बेकायदेशीर (Illegal) नाही. ही नक्कीच आश्चर्याची गोष्ट आहे. आवश्यक असलेल्या परवानग्या घेऊन येथे कोणीही प्रवेश करू शकतो. डार्क वेबचा बेकायदेशीर हेतूंसाठी होणारा वापर मात्र नक्कीच गुन्हा आहे. एखादी व्यक्ती असा गुन्हा करताना आढळल्यास तिला शिक्षा होऊ शकते.
    First published:

    Tags: High speed internet, Internet

    पुढील बातम्या