मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

35 हजारात खरेदी करा 1 लाखहून अधिक किंमत असणारी Bajaj Pulsar 180 बाईक, पाहा डिटेल्स

35 हजारात खरेदी करा 1 लाखहून अधिक किंमत असणारी Bajaj Pulsar 180 बाईक, पाहा डिटेल्स

Bajaj Pulsar 180Dts-i बाईक केवळ 35 हजार रुपयांत खरेदी करता येईल. नव्या Pulsar 180 ची किंमत 1 लाख रुपयांहून अधिक आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : एखादी चांगली परंतु कमी बजेटमध्ये बाईक (Bike) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Bajaj Pulsar 180Dts-i बाईक केवळ 35 हजार रुपयांत खरेदी करता येईल. नव्या Pulsar 180 ची किंमत 1 लाख रुपयांहून अधिक आहे. अशात Bajaj Pulsar 180 घेण्याची इच्छा असेल आणि बजेट कमी असेल, तरी आता स्वस्तात ही बाईक खरेदी करू शकता.

Bajaj Pulsar 180Dts-i बाईक ही सेकंड हँड बाईक आहे. ही बाईक आतापर्यंत एकूण 28,897 किलोमीटर चालली आहे. या बाईकमध्ये 178cc इंजिन मिळेल. सेकंड हँड बाईक आणि स्कूटरची खरेदी-विक्री करणारी वेबसाईट CredR वर Bajaj Pulsar 180Dts-i बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकवर 5000 रुपये किमतीची 6 महिन्यांची वॉरंटी आणि अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा मिळते.

जर तुम्हाला या बाईकबाबत अधिक माहिती हवी असेल, तर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पिन कोड CredR वर टाकून माहिती घेऊ शकता. तसंच या वेबसाईटवरुन थेट खरेदी करता येते. जर या बाईकची तुमच्या घरी डिलीव्हरी हवी असल्यास त्यासाठी 399 रुपये द्यावे लागतात. तसंच शोरुममधून खरेदी करायची असल्यास, तेथूनही खरेदी करता येऊ शकते.

अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करा Mahindra Scorpio, XUV500 आणि TUV300, पाहा काय आहे किंमत

नव्या बजाज Pulsar 180 बाईकची एक्स शोरुम किंमत 1.7 लाख रुपये आहे. बजाज ऑटोने यात 15 लीटर टाकी दिली असून याचं वजन 151 किलोग्रॅम आहे. तसंच BS6 कम्पलायंट 178.6cc सिंगल-सिलेंडर एयर-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 5-स्पीड गियरबॉक्ससह युक्त आहे. बजाजच्या Pulsar 180 ची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. परंतु बजेट नसल्यास, आता ही बाईक स्वस्तात खरेदीची संधी आहे.

First published: