जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / तुमच्या छोट्याशा चुकीमुळे मिळणार नाही Driving License; टेस्ट देताना लक्षात ठेवा ही एक गोष्ट

तुमच्या छोट्याशा चुकीमुळे मिळणार नाही Driving License; टेस्ट देताना लक्षात ठेवा ही एक गोष्ट

तुमच्या छोट्याशा चुकीमुळे मिळणार नाही Driving License; टेस्ट देताना लक्षात ठेवा ही एक गोष्ट

ड्रायव्हिंग टेस्टवेळी (Driving test) या चुकीमुळे 31 टक्के लोकांचं ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनत नाही.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढतेवेळी आपल्याला आरटीओमध्ये (RTO) जात नियमांनुसार वाहन चालवून दाखवावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास आपल्याला लायसन्स किंवा वाहन परवाना दिला जातो. सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नुकताच एक नवा नियम (New Rules For DL) लागू केला आहे. याबरोबरच सरकार ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एकीकडे ऑनलाइन करत असताना दुसरीकडे राज्यांमधील आरटीओंची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठीच्या टेस्टमध्ये नव्या मापदंडांचाही समावेश केला जात आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेवेळी (Driving Test) खरंतर प्रत्येक वाहनचालक सावधगिरी बाळगताना दिसतो. मात्र एका साध्या चुकीमुळे तो परीक्षेत फेल होऊ शकतो आणि या चुकीमुळे त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. ही चुक कोणती असू शकते आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी परीक्षा देताना काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया सविस्तर… या कारणामुळे वाहनचालक होतात फेल देशातील आरटीओंमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी चाचणी परीक्षा देताना अयशस्वी ठरण्यामागील कारणे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport And Highways) शोधली असता, यातून काही बाबी स्पष्ट झाल्या. हे वाचा -  Trafficनियमांच उल्लंघन केल्यास दंड भरण्याबाबत नवा नियम,तुमच्यावर असा होईल परिणाम चार चाकी वाहनांसाठी (Four Wheeler) चाचणी परीक्षा देताना 31 टक्के चालक गाडी रिव्हर्स (Reverse) घेताना चूक करतात. वाहनचालक वाहन सरळ किंवा उजवीकडे – डावीकडे योग्य पध्दतीने वळवतात. परंतु, जेव्हा वाहन रिव्हर्स घ्यायला सांगितले जाते तेव्हा त्यांच्याकडून चूक होते. अशी चूक करणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण 31 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतील नवे नियम काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नवे नियम आणि पासिंगची टक्केवारी याबाबत संसदेत लेखी उत्तर देताना सांगितले की ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराला चाचणीत किमान 69 गुण मिळणे आवश्यक आहे. यानंतरच संबंधित अर्जदार पुढील परीक्षेस पात्र ठरणार आहे. हे वाचा -  मुंबईत पहिलं पब्लिक Electric Charging Station सुरू, द्यावे लागणार इतके पैसे याशिवाय मर्यादित जागेत गाडी उजवीकडे आणि डावीकडे वळवणे, आणि सरळ चालवण्यासाठी विशेष कौशल्य चालकाकडे असणे आवश्यक आहे. चाचणीदरम्यान गाडी रिव्हर्स घेताना चालकाने नेमकेपणावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. अशी असेल नवी टेस्ट अर्जदारास चाचणी देण्यासाठीच्या नियोजित वेळी एक व्हिडीओ लिंक उपलब्ध करुन दिली जाईल. यात ड्रायव्हिंग टेस्ट विषयी सर्वांगीण माहितीचा समावेश असेल. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट वेळी अर्जदारास LED स्क्रिनवर टेस्टचा डेमो दाखवला जाईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात