Home /News /technology /

WhatsApp वरुन बँक अकाउंट रिमूव्ह करायचं आहे? फॉलो करा सोप्या स्टेप्स

WhatsApp वरुन बँक अकाउंट रिमूव्ह करायचं आहे? फॉलो करा सोप्या स्टेप्स

WhatsApp वर तुम्ही एकाहून अधिक बँक अकाउंट वापरत असाल आणि त्यापैकी एक हटवायचं असेल, तर WhatsApp च्या लेटेस्ट वर्जनवर हे करता येऊ शकतं.

  नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : सध्या पेमेंटसाठी Google Pay, UPI, Paytm सह अनेक पेमेंट गेटअवे आहेत. परंतु आता इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp वरही Payment चा पर्याय देण्यात आला आहे. जर तुम्हीही WhatsApp Payment Service चा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. WhatsApp वर तुम्ही एकाहून अधिक बँक अकाउंट वापरत असाल आणि त्यापैकी एक हटवायचं असेल, तर WhatsApp च्या लेटेस्ट वर्जनवर हे करता येऊ शकतं. हे फीचर Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

  आता Offline करु शकता Aadhar Verification, वाचा संपूर्ण प्रोसेस

  काय आहे प्रोसेस - - सर्वात आधी WhatsApp ओपन करा आणि वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. - आता Payment पर्यायावर क्लिक करा. इथे बँक अकाउंटची एक लिस्ट दिसेल. - WhatsApp Payment मध्ये जे अकाउंट नको आहे, जे हटवायचं आहे त्याची निवड करा. - 3 डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर ‘Remove bank account’ वर क्लिक करा. - कन्फर्मेशननंतर ‘Payment method successfully removed’ असा टेक्स्ट पॉप-अप येईल.

  Driving License हरवलं? घरबसल्या असं बनवा डुप्लीकेट; पाहा संपूर्ण प्रोसेस

  WhatsApp वर अकाउंट लिंक नसल्यास पैसे कसे मिळतील - - Accept Payment वर क्लिक करा. - पेमेंट अटी आणि पॉलिसी पेजवर Accept करा आणि Continue वर टॅप करा. - SMS द्वारे वेरिफायवर टॅप करा. - WhatsApp Mobile नंबरशी जोडलेले सर्व बँक अकाउंट्स लिस्टमध्ये दिसतील. - कनेक्ट करण्यासाठी अकाउंट सिलेक्ट करा आणि Done वर क्लिक करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, Whatsapp pay, WhatsApp user

  पुढील बातम्या