Home /News /technology /

WhatsApp वर Delete केलेला मेसेजही वाचता येणार; ही आहे ट्रिक

WhatsApp वर Delete केलेला मेसेजही वाचता येणार; ही आहे ट्रिक

ज्यावेळी कोणी चॅटवर मेसेज पाठवून डिलीट करतं, त्यावेळी This message was deleted असं नोटिफिकेशन दिसतं. त्यानंतर एकदा डिलीट झालेला मेसेज वाचता येत नव्हता. पण आता एक अशी ट्रिक आहे, ज्याच्या मदतीने डिलीट केलेला मेसेजही वाचता येणार आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 7 डिसेंबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. सध्या पर्सनल ते अगदी सोशल, अनेक ऑफिशियल चॅटही आता व्हॉट्सअ‍ॅपवर होत आहेत. अनेकदा लोक WhatsApp वर मेसेज पाठवून नंतर डिलीट (Deleted messeges) करतात. समोरच्याकडून मेसेज डिलीट झाल्यानंतर त्याने नेमकं काय पाठवलं असेल, असे अनेक तर्क आपण लावत बसतो. पण आता यासाठी तर्क लावत बसण्याची गरज लागणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट झालेला मेसेज आता सहजपणे वाचता येणार आहे. ज्यावेळी कोणी चॅटवर मेसेज पाठवून डिलीट करतं, त्यावेळी This message was deleted असं नोटिफिकेशन दिसतं. त्यानंतर एकदा डिलीट झालेला मेसेज वाचता येत नव्हता. पण आता एक अशी ट्रिक आहे, ज्याच्या मदतीने डिलीट केलेला मेसेजही वाचता येणार आहे.

  (वाचा - भारतीय कंपनीचं जगातील सर्वात स्वस्त सर्टिफाइड हेल्मेट; जाणून घ्या किंमत)

  डिलीट केलेला मेसेज वाचण्यासाठी - - सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) WhatsRemoved+ अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. - अ‍ॅप ओपन केल्यानंतर काही परमिशन्स मागितल्या जातील, त्या allow कराव्या लागतील.

  (वाचा - आता whatsappवर मिळणार PNR status आणि ट्रेन प्रवासाची माहिती;जाणून घ्या प्रक्रिया)

  - आता WhatsApp अ‍ॅक्सेस करण्याची परमिशन सिलेक्ट करावी लागेल. - आता कोणीही व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज डिलीट केल्यास, तो वाचता येईल. - हे अ‍ॅप केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनसाठीच उपलब्ध आहे. दरम्यान, युजर्सला (Whatsapp Users) येत्या वर्षात व्हॉटसअ‍ॅपच्या सर्व अटी (Whatsapp terms and policy) पूर्णपणे स्वीकाराव्या लागणार आहेत. जर युजर्सना या अटी स्वीकारायच्या नसतील, तर त्यांना त्यांचं व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट डिलीट करावं लागणार आहे.

  (वाचा - Whatsapp युझर्ससाठी महत्त्वाचं! अटी स्वीकारा नाहीतर डिलीट करावं लागणार अकाऊंट)

  व्हॉटसअ‍ॅपचे जगभरात 1.5 अब्जांवर युजर्स आहेत. येत्या काळात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सुरू ठेवण्यासाठी या सर्व युजर्सला नवीन टर्म्स ऑफ सर्व्हिस स्वीकारावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागूकरण्यात येणार आहेत. जर युजर्सने या अटी स्वीकारल्या नाहीत, तर त्यांना त्यांचं अकाउंट डिलीट करावं लागणार आहे, अशी माहिती डब्ल्यूए बीटा इन्फोने (WA Beta Info) दिली आहे. मात्र या नव्या अटी नेमक्या काय असतील याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Whatsapp

  पुढील बातम्या