Home /News /technology /

भारतीय कंपनीचं जगातील सर्वात स्वस्त सर्टिफाइड हेल्मेट; जाणून घ्या किंमत

भारतीय कंपनीचं जगातील सर्वात स्वस्त सर्टिफाइड हेल्मेट; जाणून घ्या किंमत

नुकत्याच झालेल्या मोटर वाहन कायद्यांतर्गत टू-व्हीलर चालकांना सरकारने भारतात केवळ BIS Certification असणारे हेल्मेट तयार करून विक्री करणं अनिवार्य केलं आहे. हेल्मेट तयार करणाऱ्या या भारतीय कंपनीने सर्वात स्वस्त आणि सुरक्षित हेल्मेट तयार केल्याचा दावा केला आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : भारतीय कंपनी डीटलने (Detel) जगातील सर्वात स्वस्त सर्टिफाइड हेल्मेट (BIS Certified Helmet) तयार केल्याचा दावा केला आहे. कंपनीने आपलं नवं हेल्मेट Detel TRED बीआयएस सर्टिफिकेशननुसार तयार केलं आहे. नुकत्याच झालेल्या मोटर वाहन कायद्यांतर्गत टू-व्हीलर चालकांना सरकारने भारतात केवळ बीआयएस सर्टिफिकेशन (BIS Certification) असणारे हेल्मेट तयार करून विक्री करणं अनिवार्य केलं आहे. अशात हे नवं Detel TRED BIS Certified हेल्मेट इतर कंपन्यांना चांगलीच टक्कर देत आहे. हे हेल्मेट ग्राहकांची सुविधा आणि मजबूत लक्षात ठेऊन तयार करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलंय. ग्राहक हे हेल्मेट डीटलच्या अधिकृत वेबसाईट www.detel-india.com वर आणि अॅमेझॉन वेबसाईटवरून खरेदी करू शकतात. या हेल्मेटची किंमत केवळ 699 रुपये इतकी आहे.

  (वाचा - थंडीत लाँग ड्राईव्हला जाताय?हीटर सीट कव्हरने आरामदायी प्रवास करा, काय आहे किंंमत)

  स्वस्त आणि सुरक्षित हेल्मेट - Detel TRED हेल्मेट लाँच करताना, डीटलचे संस्थापक योगेश भाटिया यांनी सांगितलं की, हेल्मेट प्रोडक्शनच्या क्षेत्रात वेगात वाढणारी कंपनी म्हणून डीटलचे हेल्मेट स्वस्त आणि ग्राहकांसाठी सुरक्षितही आहेत. अनेक ग्राहक रस्त्यालगत हेल्मेटची विक्री करणाऱ्यांकडून हेल्मेट खरेदी करतात. परंतु त्यामुळे हेल्मेट वापरण्याचा उद्देश पूर्ण होत नाही आणि धोकादेखील कायम राहतो.

  (वाचा - सावधान! Amazon, Apple च्या नावाने ऑनलाईन फसवणूक; कसा कराल यापासून बचाव)

  ऍडव्हान्स टेक्नोलॉजी आणि क्वालिटीचा वापर करत कंपनीने टिकाऊ, ट्रेंडी, स्वस्त, महिला आणि पुरुषांना लक्षात घेऊनच हे हेल्मेट डेव्हलप केलं आहे. दररोज बाईने प्रवास करणांऱ्या लक्षात घेऊन हे तयार करण्यात आलं आहे. हे बीआयएस सर्टिफिकेशन (Bureau of Indian Standards) हेल्मेट रिमूव्हेबल इंटीरियरने युक्त आहे. हेल्मेटचं वायजर स्क्रॅच फ्री आहे. तसंच रात्रीच्यावेळी बाईक चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने याच्या हेडवर रिफ्लेक्टरही लावण्यात आला आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या