Home /News /lifestyle /

Whatsapp युझर्ससाठी महत्त्वाची बातमी! अटी स्वीकारा नाहीतर डिलीट करावं लागणार अकाऊंट

Whatsapp युझर्ससाठी महत्त्वाची बातमी! अटी स्वीकारा नाहीतर डिलीट करावं लागणार अकाऊंट

WhatsApp Mute Videos: व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर असणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्ट नुसार, व्हॉट्सअ‍ॅपमधील अँड्रॉइडच्या 2.20.207.2 या बीटा व्हर्जनमध्ये हे व्हिडिओ म्यूट करण्याचे फिचर आढळून आले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स कोणालाही व्हिडीओ पाठवण्याच्या आधी किंवा स्टेटसला व्हिडिओ ठेवण्याच्या आधी म्यूट करू शकणार आहेत. सध्या या नवीन फीचरवर काम सुरु आहे.

WhatsApp Mute Videos: व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर असणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्ट नुसार, व्हॉट्सअ‍ॅपमधील अँड्रॉइडच्या 2.20.207.2 या बीटा व्हर्जनमध्ये हे व्हिडिओ म्यूट करण्याचे फिचर आढळून आले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स कोणालाही व्हिडीओ पाठवण्याच्या आधी किंवा स्टेटसला व्हिडिओ ठेवण्याच्या आधी म्यूट करू शकणार आहेत. सध्या या नवीन फीचरवर काम सुरु आहे.

Whatsapp युझर्सला येत्या वर्षात व्हॉटसअॅपच्या सर्व अटी पूर्णपणे स्वीकाराव्या लागणार आहेत.

    नवी दिल्ली, 04 डिसेंबर : व्हॉटसअ‍ॅप (Whatsapp) युझर्सला नाराज करणारी एक बातमी आहे. व्हॉटसअ‍ॅप येत्या वर्षाच्या सुरुवातीला टर्म्स आफ सर्व्हिस अपडेट करणार आहे.  व्हॉटसअ‍ॅपच्या सेवा वापरणाऱ्या युझर्सला (Whatsapp Users) येत्या वर्षात व्हॉटसअ‍ॅपच्या सर्व अटी )(Whatsapp terms and policy) पूर्णपणे स्वीकाराव्या लागणार आहेत. जर युझर्सना या अटी स्वीकारायच्या नसतील तर त्यांना त्यांचे व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट डिलीट करावं लागणार आहे. व्हॉटसअ‍ॅपचे जगभरात 1.5 अब्जांवर युझर्स आहेत. येत्या काळात व्हॉटसअ‍ॅपचा वापर सुरू ठेवण्यासाठी या सर्व युझर्सला नवीन टर्म्स ऑफ सर्व्हिस स्वीकारावी लागेल. व्हॉटसअ‍ॅपच्या नवीन अटी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू करण्यात येणार आहेत. जर युझर्सने या अटी स्वीकारल्या नाहीत तर त्यांना त्यांचे अकाऊंट डिलीट करावे लागणार आहे, अशी माहिती डब्ल्यूए बीटा इन्फोने (WA Beta Info) दिली आहे. मात्र या नव्या अटी नेमक्या काय असतील याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या व्हर्जनचे (version) अपडेट आले आहेत. डब्ल्यूए बीटा इन्फोच्या एका अहवालानुसार, नव्या अपडेटबरोबरच व्हॉटसअ‍ॅपने अ‍ॅप अंतर्गत अनाऊन्समेंट पाठवण्यासाठी एक विशेष फिचर अ‍ॅड केलं आहे. म्हणजेच व्हॉटसअ‍ॅपला आपल्या युझर्सला काही माहिती द्यायची असेल किंवा काही घोषणा करायची असेल तर ती अ‍ॅपच्याच माध्यमातून या फिचरद्वारे दिली जाणार आहे. हे वाचा - आता whatsappवर मिळणार PNR status आणि ट्रेन प्रवासाची माहिती;जाणून घ्या प्रक्रिया अशा प्रकारची माहिती युझर्सला चॅटऐवजी बॅनर स्वरूपात दिली जाईल. इथं टॅप केल्यानंतर स्वतंत्र वेबसाईट खुली होईल आणि त्यात युझर्सला संबंधित माहिती सविस्तर मिळेल, असंही अहवालात सांगण्यात आलं आहे. युझर्सचं डेटा प्रोसेसिंग, बिझनेस-फेसबुक होस्टेड या सेवेचा उपयोग करून व्हॉटसअ‍ॅप चॅटसचं व्यवस्थापन आणि स्टोअर कसं करू शकतात आदींबाबतची माहिती या स्क्रिनशॉटसमध्ये देण्यात आली आहे. हे वाचा - पाठवायचा होता एकाला मेसेज गेला भलत्यालाच; गोंधळ टाळण्यासाठी नवा Whatsapp feature आपल्या धोरणात बदल केल्यामुळे व्हॉटसअ‍ॅप यापूर्वी देखील चर्चेत आलं होतं. त्यावेळी युझर्सचा डेटा फेसबुकसमवेत शेअर करण्याचं नवं धोरण व्हॉटसअ‍ॅपनं आणलं होतं. यामुळे खूप वादविवाद झाले होते. व्हॉटसअ‍ॅप फेसबुकपासून वेगळं ठेवावं आणि पैसे कमवण्यासाठी युझर्सचा डेटा विक्री करू नये तसंच तो फेसबुकसोबत शेअर करू नये, असं यावेळी व्हॉटसअ‍ॅपच्या दोन संस्थापकांचं म्हणणं होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. या कारणामुळे व्हॉटसअॅपचे संस्थापक जेन कोम यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडावं लागलं होतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Whatsapp, Whatsapp News, WhatsApp user

    पुढील बातम्या