जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता whatsapp वर मिळणार PNR status आणि ट्रेन प्रवासाची माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

आता whatsapp वर मिळणार PNR status आणि ट्रेन प्रवासाची माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

आता whatsapp वर मिळणार PNR status आणि ट्रेन प्रवासाची माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

Railofy ने दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याला 60 लाखहून अधिक ट्रेन प्रवासी, ट्रेनसंबंधी माहितीसाठी, सर्च इंजिन गुगलवर विश्वास ठेवतात, त्यावरच अवलंबून असतात. परंतु त्यांना ट्रेनच्या लाईव्ह स्टेटसची योग्य माहिती मिळत नाही. अशात Railofy ने दावा केला आहे की, ट्रेनसंबंधी सर्व माहिती, युजर्सला एकाच प्लॅटफॉर्मवर तेही whatsapp द्वारे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 डिसेंबर : आता ट्रेनच्या PNR Status सह ट्रेन लाईव्ह स्टेटस, ट्रेन उशिरा असल्यास त्याच्या माहितीसाठी एक नवं फीचर आलं आहे. Railofy नावाच्या मोबाईल ऍपमध्ये एक नवं फीचर जोडण्यात आलं आहे, ज्याच्या मदतीने whatsapp द्वारे पीएनआर स्टेटस, ट्रेनची माहिती, ट्रेनच्या लाईव्ह स्टेटससह इतरही माहिती मिळेल. मुंबई बेस्ड स्टार्टअपने बनवलेल्या Railofy ऍपच्या या नव्या फीचरमुळे रेल्वे प्रवाशांना ट्रेनसंबंधी माहिती घेता येईल. PNR स्टेटसची माहिती घ्यायची असल्यास, +91 98811 93322 या नंबरवर 10 डिजिट पीएनआर नंबर शेअर केल्यास, त्यानंतर त्या व्यक्तीला रेग्युलर पीएनआर स्टेटसबाबत माहिती मिळत राहील. ट्रेनचं तिकीट वेटिंगवर आहे की कन्फर्म याबाबतही माहिती मिळेल. त्याशिवाय व्हॉट्सअपवर ट्रेन डिले स्टेटसचीही माहिती मिळेल. तसंच प्रवासी ट्रेनमध्ये असल्यास त्याला पुढील स्टेशन, मागील स्टेशन आणि इतरही माहिती मिळेल.

(वाचा -  ..अन्यथा अडचणी वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा )

Railofy ने दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याला 60 लाखहून अधिक ट्रेन प्रवासी, ट्रेनसंबंधी माहितीसाठी, सर्च इंजिन गुगलवर विश्वास ठेवतात, त्यावरच अवलंबून असतात. परंतु त्यांना ट्रेनच्या लाईव्ह स्टेटसची योग्य माहिती मिळत नाही. अशात Railofy ने दावा केला आहे की, ट्रेनसंबंधी सर्व माहिती, युजर्सला एकाच प्लॅटफॉर्मवर तेही whatsapp द्वारे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. Railofy च्या मदतीने प्रवासाचं तिकीट काढण्यापूर्वी तिकीटाच्या किंमतीची इतर दुसऱ्या पर्यायासोबत तुलना करता येणार आहे. तसंच कोणत्या पर्यायात प्रवासासाठी किती वेळ लागेल, तेही यात समजणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात