मुंबई, 23 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. विशेषतः बहुतेकांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. त्यामुळे ऑक्सिजनची (Oxygen) मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत आता ऑक्सिजनचा (Oxygen Cylinder) तुटवडा निर्माण झाले आहे. रुग्णालयातील रुग्णांचं प्रमाणही इतकं वाढलं आहे की अनेकांना घरीच उपचार दिले जात आहेत. कोरोना रुग्ण ऑक्सिमीटर (Oximeter) लावून आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासत आहे. अचानकपणे शरीरातील ऑक्सिजनची पातळी (Oxygen level) कमी झाली आणि तुम्ही किंवा एखादा कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत असेल तर मग काय? अशावेळी काय करायचं? घरी कोरोना रुग्ण उपचार घेत असताना शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास पॅनिक होऊ नका. तर आपल्या पोटावर किंवा छातीवर झोपण्याचा म्हणजे उलटं झोपा. याला प्रोनिंग पोझिशन असं म्हटलं जातं. यामुळे फुफ्फुसातील ऑक्सिजनची पातळी वाढते. पाटणा एम्सने कोरोना रुग्णांसाठी सध्या अशाच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता ही प्रोनिंग पोझिशन म्हणजे नेमकं काय आणि कसं करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हा व्हिडीओ पाहा. डॉ. सिमोन सोईन यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात टप्प्याटप्याने याची माहिती आणि करण्याची योग्य पद्धतही देण्यात आली आहे.
Oxygen saturation can become the difference between home-care & hospitalisation for COVID patients.
— Dr. Simal Soin (@DrSimalSoin) April 21, 2021
Our amazing team @AaynaClinic just made a guide to proning. Everyone must know about it at this time. Pls share widely! pic.twitter.com/2HRoi9oEQP
दरम्यान याबाबत न्यूज 18 शी बोलताना दिल्लीच्या BLKC सेंटर फॉर क्रिटिकल केअरचे वरिष्ठ संचालक डॉ. राजेश पांडे यांनी सांगितलं, “पोटावर रुग्णाला झोपावून ऑक्सिजनची पातळी वाढवणं हा वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेला एक प्रयोग आहे. फुफ्फुसाचे तीन भाग असतात. मधला, मागचा आणि पुढचा. जेव्हा आपण पाठीवर झोपतो आणि छाती वर असते तेव्हा पाठीला रक्तपुरवठा उत्तम होतो आणि पुढच्या भागाला कमी होतो. जेव्हा शरीरात हवा जाते तेव्हा पाठीला ऑक्सिजन कमी मिळतं. हेच उलट करण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती छातीवर झोपते तेव्हा हृदय ब्रेस्ट बोनवर राहतं आणि फुफ्फुसाला प्रसरणाला जागा मिळते आणि पाठीला जिथं रक्तप्रवाह जास्त असतो तिथं हवेचा फ्लो वाढतो. चांगलं रक्ताभिसरण आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते” हे वाचा - आता लवकरात लवकर बरे होणार कोरोना रुग्ण; Zydus cadila च्या Virafin औषधाला मंजुरी “कोरोनाआधी सामान्यपणे श्वास घ्यायला गंभीर त्रास होत असलेल्या किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत वापरण्यात आली. आम्ही त्यांना अशा परिस्थितीत 16 तास पोटावर झोपवून ठेवतो. पण कोरोना महासाथीत सुरुवातीला असं केलं जात नव्हतं. आता कोरोना संकटात ऑक्सिजनची कमतरता असल्याने पोटावर झोपवणं ही आदर्श स्थिती बनवली आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रित करता येऊ शकते. पण श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या कोणत्याही किंवा प्रत्येक रुग्णाला असं करायला सांगू शकत नाही”, असं डॉ. पांडे म्हणाले. हे वाचा - कोरोनाविरोधी लढ्यात भारताला मोठं यश! लशीनंतर औषधही तयार; चाचणीचा एक टप्पा यशस्वी याचा पद्धतीचा दीर्घकालीन दुष्परिणाम काही होत नाही. तसा फायदाच आहे. पण तरी ही पद्धत तात्पुरत्या स्वरूपातील आहे. ऑक्सिजन सिलेंडरला कायमचा पर्याय किंवा रुग्णालयात न जाण्याचा कायमचा मार्ग नाही. तुम्हाला जेव्हा खरंच ऑक्सिजनची तात्काळ गरज असेल. शरीरातील ऑक्सिजन खूप खालावलं असेल आणि ऑक्सिजन सिलेंडरमार्फत मिळायला उशिर होणार असेल त्यावेळी ही पद्धत अवलंबावी. पण जास्त त्रास होत असल्यास वैद्यकीय मदत मागावी, असा सल्ला देण्यात आला आहे.