नवी दिल्ली, 11 मे : इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp ने काही दिवसांपूर्वी मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचर युजर्ससाठी लाँच केलं. या फीचरद्वारे आपलं WhatsApp Account प्रायमरी फोनशिवाय इतर चार डिव्हाइसवरही वापरता येऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे इतर डिव्हाइसवर WhatsApp चालवण्यासाठी तुमच्या प्रायमरी डिव्हाइसमध्ये इंटरनेट अॅक्टिव्ह असण्याची गरज नाही.
पण या फीचरमध्ये सर्वाधिक लक्ष याच्या Link Devices सेटिंगकडे देणं गरजेचं आहे. जर तुमचं WhatsApp Account इतर जागांवर लॉगइन असेल, तर तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो. जर दुसरा कोणी व्यक्ती यापैकी एखाद्या डिव्हाइसचा वापर करत असेल, तर तुमचं WhatsApp Chat कोणीही पाहू शकतं. मल्टी डिव्हाइस फीचरमुळे अकाउंट अधिक काळपर्यंत लॉगइन राहू शकतं. या समस्येपासून वाचण्यासाठी Unlink Devices फीचर मिळतं.
- सर्वात आधी WhatsApp ओपन करा.
- आता तीन डॉटवर क्लिक करा.
- Link Devices चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता इथे अशा सर्व डिव्हाइसेसची लिस्ट येईल, जिथे-जिथे तुमचं WhatsApp Login आहे.
- ज्या डिव्हाइसमधून WhatsApp Logout करायचं आहे, त्यावर क्लिक करा.
- आता Logout बटणावर टॅप करा.
दरम्यान, WhatsApp एका नव्या फीचरवर काम करत आहे ज्याचं नाव Companion मोड आहे. लेटेस्ट बीटा अपडेटमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp चं हे फीचर युजरला WhatsApp ला वेगवेगळ्या फोनमध्ये Login करण्याची परवानगी देईल. ABetaInfo ने हे फीचर 2.22.11.10 अँड्रॉइड बीटा वर्जनमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. तसंच हे युजर्ससाठी कधीपर्यंत लाँच केलं जाईल याचीही माहिती नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.