मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Instagram लाखो Followers मिळवायचे आहेत? लगेच करा हे 5 महत्त्वाचे बदल

Instagram लाखो Followers मिळवायचे आहेत? लगेच करा हे 5 महत्त्वाचे बदल

Instagram पॉप्युलर सोशल मीडिया आहे. यावर केवळ मनोरंजनच नाही तर याचा फायदा करुन पैसेही कमावता येतात. तुमचे Instagram Followers वाढवण्याचे असल्यास काही गोष्टी फयादेशीर ठरतील.

Instagram पॉप्युलर सोशल मीडिया आहे. यावर केवळ मनोरंजनच नाही तर याचा फायदा करुन पैसेही कमावता येतात. तुमचे Instagram Followers वाढवण्याचे असल्यास काही गोष्टी फयादेशीर ठरतील.

Instagram पॉप्युलर सोशल मीडिया आहे. यावर केवळ मनोरंजनच नाही तर याचा फायदा करुन पैसेही कमावता येतात. तुमचे Instagram Followers वाढवण्याचे असल्यास काही गोष्टी फयादेशीर ठरतील.

  नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : सध्याचं युग इंटरनेट, सोशल मीडियाचं आहे. सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. अनेक जण दिवसातील कित्येक तास केवळ सोशल मीडियावर घालवतात. सोशल मीडिया अकाउंट्स Facebook, Instagram, WhatsApp, Twitter वर पोस्ट टाकून आणि फोटो अपलोड करून लाइक्स, शेअर्स, कमेन्ट्स मिळवण्याची क्रेझ आहे. Instagram पॉप्युलर सोशल मीडिया आहे. यावर केवळ मनोरंजनच नाही तर याचा फायदा करुन पैसेही कमावता येतात. तुमचे Instagram Followers वाढवण्याचे असल्यास काही गोष्टी फायद्याचे ठरतील.

  इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्टचं कॅप्शन. अनेकांच्या पोस्ट चांगल्या असूनही त्यांना तितके लाइक्स मिळत नाहीत. त्यामुळे पोस्टला आकर्षक कॅप्शन देणं गरजेचं आहे. चांगल्या कॅप्शनने फॉलोअर्स वाढवता येऊ शकतात. ज्यांचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, त्यांच्या पोस्टला कॅप्शन नसलं तरी त्यांच्या पोस्ट लोकांपर्यंत पोहोचतात. हा टप्पा गाठायचा असेल, तर फॉलोअर्सची संख्या तितकी असणं गरजेचं आहे. ज्यांचे इन्स्टाग्रामवर 10 हजारांपर्यंत फॉलोअर्स आहेत, त्यांच्या पोस्टमध्ये किमान 50 कॅरेक्टर्सचं कॅप्शन असतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. याशिवाय कॅप्शनमध्ये इमोजी होणारा वापरदेखील फायद्याचा ठरतो.

  Instagram Bio ही सर्वांत महत्त्वाची आणि प्राथमिक बाब आहे. एखादी व्यक्ती जेव्हा तुमचं अकाउंट पाहते, तेव्हा पहिल्यांदा नजर Bio वर जाते. त्यामुळे पोस्ट्स आणि स्टोरीजसह Bio वर काम करणंही गरजेचं आहे. Bio मध्ये तुमच्याबद्दलची माहिती मोजक्या आणि आकर्षक शब्दांमध्ये मांडली पाहिजे.

  Instagram Security फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट, तुमचं अकाउंट हॅकर्सपासून राहिल सुरक्षित

  सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन अर्थात SEO आणि अल्गोरिदम यांसारख्या तांत्रिक गोष्टींचा विचार केला तर Hashtag हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. इन्स्टाग्रामवर Tags खूप महत्त्वाचे असतात. पोस्टच्या कॅप्शननंतर Hashtag वापरत असाल, तर तुमची पोस्ट त्या हॅशटॅगखाली येणाऱ्या ट्रेंडिंग पोस्ट्समध्ये दिसू शकते. परिणामी फॉलोअर्स वाढण्यासही मदत होते.

  Creator म्हणून अकाउंट सुरू केलं असेल, तर तुम्हाला तुमचं अकाउंट ट्रॅक करण्याची सुविधा मिळते. एका प्रोफेशनल डॅशबोर्डच्या मदतीने, किती जण तुमच्या पोस्ट पाहत आहेत, किती जण तुमच्या अकाउंटला भेट देत आहेत या गोष्टी जाणून घेता येतात. यामुळे तुम्ही पोस्ट केलेला कुठला कंटेंट लोकांना जास्त आवडतो हे समजतं.

  दिवसभरात Instagram वर किती वेळ घालवला? सोप्या ट्रिकने असं तपासा

  इन्स्टाग्राममधलं ऑल्ट टेक्स्ट फीचर (Instagram alt text feature) आपल्याला पोस्टमध्ये पर्यायी मजकूर जोडण्याची सुविधा देतं. त्यामुळे आपली पोस्ट कशाबद्दल आहे हे इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमला समजण्यास मदत होते. अनेक युजर्सना या फीचरबद्दल माहितीच नसतं. याबाबत जाणून घेण्यासाठी अॅडव्हान्स सेटिंग्जमध्ये माहिती घेऊ शकता.

  First published:
  top videos

   Tags: Instagram, Instagram post, Tech news