मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /दिवसभरात Instagram वर किती वेळ घालवला? सोप्या ट्रिकने असं तपासा

दिवसभरात Instagram वर किती वेळ घालवला? सोप्या ट्रिकने असं तपासा

Instagram मध्ये एक खास फीचर आहे. यामुळे युजरने इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवला याची माहिती मिळते. हे टाईम स्पेंड रिमाइंडर सेट करण्यासाठी प्रोफाईलमध्ये बदल करता येऊ शकतात.

Instagram मध्ये एक खास फीचर आहे. यामुळे युजरने इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवला याची माहिती मिळते. हे टाईम स्पेंड रिमाइंडर सेट करण्यासाठी प्रोफाईलमध्ये बदल करता येऊ शकतात.

Instagram मध्ये एक खास फीचर आहे. यामुळे युजरने इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवला याची माहिती मिळते. हे टाईम स्पेंड रिमाइंडर सेट करण्यासाठी प्रोफाईलमध्ये बदल करता येऊ शकतात.

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : सोशल मीडिया (Social Media) जवळपास सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाचा भाग झाला आहे. तुम्ही सोशल मीडियावर तासंतास घालवता असं तुम्हाला वाटत असेल, तर अशाप्रकारे वेळ घालवणारे तुम्ही एकटे नाहीत. अनेक जण कित्येक तास इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत राहतात आणि त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर अधिकच वेळ घालवल्याचं वाटत राहतं. अशावेळी अनेकदा सोशल मीडियापासून दूर जावं, हे बंद करावं असंही अनेकांना वाटू शकतं. त्यासाठी अकाउंट डिलीट करणं किंवा ते डिअॅक्टिवेट करणं हा उपाय असल्याचं वाटतं. परंतु सोशल मीडियापासून दूर जाण्याचा हा एकमेव उपाय नाही. काही स्टेप्सद्वारे इन्स्टाग्रामवर कमी वेळ घालवता येऊ शकतो. तसंच किती वेळ Instagram वर घालवला हेदेखील तपासता येतं.

जर तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram Account) नोटिफिकेशन ऑन असेल, तर प्रत्येकवेळी ज्याला तुम्ही फॉलो करता तो लाईव्ह आल्यास किंवा इतर पोस्टबाबत नोटिफिकेशन येतं. यामुळे आपोआपचं अॅप ओपन केलं जातं. त्यामुळे असं प्रत्येक वेळी इन्स्टाग्राम येणं टाळायचं असल्यास, नोटिफिकेशन ऑफ करणं फायद्याचं ठरतं.

यासाठी प्रोफाईलमध्ये तीन डॉटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेटिंगमध्ये नोटिफिकेशन ओपन करावं लागेल. इथे पुश नोटिफिकेशन सिलेक्ट करुन, केवळ जे नोटिफिकेशन हवं आहे तेच Allow करता येऊ शकतं.

WhatsApp युजर्ससाठी धोक्याचा इशारा, अधिक फीचरच्या नादात वाढतील समस्या

Time Limit -

Instagram मध्ये एक खास फीचर आहे. यामुळे युजरने इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवला याची माहिती मिळते. हे टाईम स्पेंड रिमाइंडर (Set Time Reminder) सेट करण्यासाठी प्रोफाईलमध्ये बदल करता येऊ शकतात.

WhatsAppवर चुकून दुसऱ्याला सेंड झाला मेसेज?टाईम लिमिट संपल्यानंतर असा करा डिलीट

- यासाठी अकाउंटमध्ये Your Activity वर जावं लागेल.

- इथे Set Daily Reminder वर क्लिक करुन टाईम सेट करुन रिमाइंडर सिलेक्ट करावं लागेल.

इन्स्टाग्रामवर एका फीचरद्वारे लाईक्स हाईड करण्याचा पर्याय मिळतो. यामुळे युजरला माहिती कमी मिळेल आणि यामुळे ते या Instagram Platform वर वेळही कमी घालवतील.

First published:
top videos

    Tags: Instagram, Instagram post