मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचा फोन Hack झालाय? फोनमध्ये Malware आहे की नाही असं ओळखा

तुमचा फोन Hack झालाय? फोनमध्ये Malware आहे की नाही असं ओळखा

सायबर गुन्हेगार अत्यंत चालाखीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस (Virus) आणि मालवेअर (Malware) इन्स्टॉल करून तुमचा डाटा नकळत चोरण्याची शक्यता असते.

सायबर गुन्हेगार अत्यंत चालाखीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस (Virus) आणि मालवेअर (Malware) इन्स्टॉल करून तुमचा डाटा नकळत चोरण्याची शक्यता असते.

सायबर गुन्हेगार अत्यंत चालाखीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस (Virus) आणि मालवेअर (Malware) इन्स्टॉल करून तुमचा डाटा नकळत चोरण्याची शक्यता असते.

  नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : अनेक गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्यामुळे स्मार्टफोन (Smartphone) हा आपली दैनंदिन गरज बनला आहे. सध्या बाजारात विविध फीचर्स असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर युजर्स त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे ॲप्स डाउनलोड करत असतात. आता आर्थिक व्यवहार, शासकीय योजनांचा लाभ इत्यागी गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे स्मार्टफोन युजर्सची संख्या लक्षणीय वाढली आहे. सर्व बाबी ऑनलाइन झाल्याने मात्र सायबर गुन्हेगारीचं (Cyber Crime) प्रमाण वाढलं आहे.

  कोरोनाकाळात एकीकडे ऑनलाइनला अधिक प्राधान्य दिलं जात असताना दुसरीकडे हॅकिंगसारखे (Hacking) प्रकार वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर स्मार्टफोन युजर्सने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण सायबर गुन्हेगार अत्यंत चालाखीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस (Virus) आणि मालवेअर (Malware) इन्स्टॉल करून तुमचा डाटा नकळत चोरण्याची शक्यता असते. काही मालवेअर्स तर असे असतात की ते तुमच्या फोनची सर्व अ‍ॅक्टिव्हिटी मॉनिटर करतात. स्मार्टफोन हॅक होऊ नये, यासाठी युजर्सला विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या फोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर आहे की नाही कसं ओळखाल?

  स्मार्टफोनमध्ये व्हायरस येऊ नये, यासाठी अलर्ट राहणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले अ‍ॅप्स हे अधिकृत गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून (Apple App Store) डाउनलोड करावेत. एखादं अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर ते तुमचा डिव्हाईस अ‍ॅक्सेस करण्यासाठी कोणकोणत्या परवानग्या मागतं, याकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. एखाद्या परवानगीविषयी शंका निर्माण झाल्यास ती देण्याचं टाळावं. त्याचबरोबर युजर्सने आपल्या स्मार्टफोनमध्ये खात्रीशीर अँटिव्हायरस (Antivirus) डाउनलोड करून घ्यावा. यामुळे स्कॅनिंगवेळी व्हायरस माहिती मिळू शकते.

  WhatsApp चं भन्नाट फीचर, आता तुमच्या फोटोचंही बनवता येणार Sticker

  कोणत्याही स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप्सच्या माध्यमातून व्हायरस येऊ शकतो. जर एखाद्या अ‍ॅपमुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस आला आहे, असं जर वाटलं तर तातडीनं त्याबाबत पडताळणी करावी. ही पडताळणी तुम्ही मेन्यूमध्ये जाऊन करू शकता. या पडताळणी दरम्यान जर एखादं अॅप तुम्हाला संशयास्पद वाटलं तर ते तातडीनं अनइन्स्टॉल (Uninstall) करावं. स्मार्टफोनमधील कोणत्या अ‍ॅपमुळे अधिक डेटा वापरला जातोय, हे देखील याच पद्धतीने पडताळता येऊ शकतं.

  स्मार्टफोनमध्ये व्हायरस आहे की नाही हे तपासण्याची अजून एक सोपी पध्दत आहे. यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचं टेम्परेचर तपासवं. जर स्मार्टफोनचा वापर कमी असेल आणि तरी तो प्रमाणापेक्षा अधिक गरम होत असेल तर तो हॅक झाला असून, हॅकर्स तुमचा डेटाही चोरत आहेत, असं समजावं. जर तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा लवकर संपत असेल किंवा वापराच्या तुलनेत स्मार्टफोनचं बिल प्रमाणापेक्षा जास्त येत असेल, तर हॅकर्स तुमचा स्मार्टफोन अ‍ॅक्सेस करत आहेत, असं समजावं.

  केवळ 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, अशी करा सोपी प्रोसेस

  जर तुम्हाला स्मार्टफोनमध्ये प्रमाणापेक्षा जास्त जाहिराती (Advertise) दिसत असतील, तर फोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर असल्याचा संकेत समजावा. ज्याअर्थी फोनमध्ये जास्त जाहिराती दिसत आहेत, त्याअर्थी हॅकर्सनं तुमच्या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅडवेअर इन्स्टॉल केलं आहे, हे स्पष्ट होतं. जर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना तुमच्या नकळत स्पॅम मेसेज येत असतील तर अशा वेळी तुम्ही सतर्क होणं आवश्यक आहे.

  First published:
  top videos

   Tags: Cyber crime, Malware, Online fraud, Tech news