जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमचाही Gmail होतो ओव्हारफ्लो? महत्त्वाचे मेल चुकण्याची भिती? या टीप्स करा फोलो

तुमचाही Gmail होतो ओव्हारफ्लो? महत्त्वाचे मेल चुकण्याची भिती? या टीप्स करा फोलो

तुमचाही Gmail होतो ओव्हारफ्लो?

तुमचाही Gmail होतो ओव्हारफ्लो?

जेव्हा आपण Gmail उघडतो, तेव्हा आपण पाहतो की इनबॉक्स स्पॅम, न्यूजलेट आणि प्रमोशनल ईमेलने भरलेला असतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑक्टोबर : जीमेल आपल्या सर्वांसाठी एक आवश्यक प्लॅटफॉर्म आहे. हे विशेषतः Android वापरकर्त्यांसाठी सर्वात महत्वाचे अ‍ॅप्सपैकी एक आहे. कारण अँड्रॉइड फोन सेटअप करण्यासाठी जीमेल आयडी आवश्यक आहे. मात्र, अनेक वेळा आपण जीमेल उघडतो तेव्हा तो अनावश्यक स्पॅम, न्यूजलेटर आणि प्रमोशनल ईमेलने भरलेला असतो. कधीकधी इनबॉक्स इतका भरलेला असतो की महत्त्वाचे ईमेल चुकले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही जीमेलच्या अनावश्यक ईमेलने हैराण झाला असाल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा जीमेल इनबॉक्स साफ करू शकता आणि स्पॅमपासून मुक्त होऊ शकता. स्पॅम ईमेलला Unsubscribe करा आणि मास रिपोर्ट करा 1) Gmail वर लॉग इन करा आणि तुम्हाला ज्यांना Unsubscribe करायचं आहे ते सर्व स्पॅम ईमेल निवडा (तुम्ही कोणतेही महत्त्वाचे ईमेल आयडी निवडले नसल्याची खात्री करा). 2) टॉपला असलेल्या ‘i’ चिन्हावर क्लिक करा आणि तुम्हाला ‘रिपोर्ट स्पॅम’ किंवा ‘Report Spam and unsubscribe’ असे पर्याय दाखवले जातील. 3) यादीतील आयडी शोधा आणि जर येथे काहीही महत्त्वाचे दिसत नसेल, तर स्पॅमचा रिपोर्ट करा आणि सदस्यता रद्दचा पर्याय निवडा. 4) आता तुम्हाला या खात्यांमधून ईमेल मिळणे बंद होईल. वाचा - काय सांगता! 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आयफोन? स्पॅम ईमेल शोधण्यासाठी फिल्टर लागू करा:- 1: Gmail उघडा, आणि टॉपला असलेल्या शोध बॉक्सवर क्लिक करा आणि सर्व प्रमोशनल ईमेल्सची यादी करण्यासाठी Unsubscribe करा. 2: हे सर्व स्पॅम ईमेल निवडा, पुन्हा एकदा ते तपासून त्याची खात्री करा. जेणेकरून तुम्ही वापरत असलेले असे कोणतेही न्यूजलेटर किंवा मेल डिलीट होणार नाही. 3: टॉपला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा आणि यासारखे फिल्टर संदेश निवडा. 4: आता Create Filter पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला या ईमेल्सचे काय करायचे आहे ते निवडा. जर तुम्हाला हे ईमेल आपोआप हटवायचे असतील, तर तुम्ही Create a filter पर्यायावर क्लिक करून Delete it पर्याय निवडू शकता. 5: तुम्हाला तळाशी एक पॉप-अप मिळेल जो तुम्हाला सूचित करेल की फिल्टर तयार केले आहे. हटवण्याव्यतिरिक्त, तुम्ही अशा ईमेल्सना लेबल लावून किंवा वाचलेले म्हणून चिन्हांकित करून फिल्टर करणे देखील निवडू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

Temporary ID वापरा :- तुम्ही तुमचा प्राथमिक Gmail आयडी रँडम वेबसाइटवर शेअर करता तेव्हा, तुमचा आयडी अनेक थर्ड पार्टींसोबत शेअर केला जातो. ज्यामुळे तुम्हाला स्पॅम ईमेल मिळण्याचा धोका असतो. कधीकधी स्पॅम ईमेल वैध वाटू शकतात. तुम्ही फिशिंग लिंकवर क्लिक करू शकता, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीला धोका निर्माण होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Android , gmail
  • First Published :
जाहिरात
जाहिरात