जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / काय सांगता! 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आयफोन?

काय सांगता! 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आयफोन?

काय सांगता! 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आयफोन?

काय सांगता! 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आयफोन?

फ्लिपकार्टवरही सध्या ‘बिग दिवाळी सेल’सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अ‍ॅपल आयफोन 11 हा स्मार्टफोन अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 22 ऑक्टोबर: दिवाळीनिमित्त अनेक ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्सवर सेल सुरू आहेत. या सेलमध्ये भन्नाट ऑफर्स देण्यात येत आहेत. फ्लिपकार्टवरही सध्या ‘बिग दिवाळी सेल’सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अ‍ॅपल आयफोन 11 हा स्मार्टफोन अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. आयफोन 14 सीरिज लाँच झाल्यापासून अ‍ॅपल आयफोनची जुनी मॉडेल्स स्वस्त झाली आहेत. गेल्या महिन्यातदेखील, आयफोन 13, आयफोन 12 आणि आयफोन 11 हे स्मार्टफोन्सअमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्वस्तात विकले जात होते. आता फ्लिपकार्टवरच्या दिवाळी सेलमध्येही आयफोनवर भन्नाट ऑफर मिळत असून, हा सेल 23 ऑक्टोबर रोजी संपत आहे. बिग दिवाळी सेलमध्ये आयफोन 11 च्या किमतीवर मोठी सूट मिळतेय. या सेलमध्ये तुम्ही 35,999 रुपयांपासून हा फोन खरेदी करू शकता. भारतात या फोनची मूळ किंमत 43,900 रुपये आहे. आता कंपनी फोनवर 7,910 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, फोनवर 18,500 रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफरदेखील मिळत आहे. ही ऑफर घेतल्यानंतर फोनची किंमत 16,240 रुपये होईल. एवढंच नाही, तर फोन खरेदी करताना एसबीआय कार्डद्वारे 5,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना फोनवर 10 टक्के सूटही मिळेल. हेही वाचा:  कमी खर्चात घराची सजावट करा, Amazon वरून डिस्काउंटसह खरेदी करा ‘या’ झक्कास गोष्टी 2019 मध्ये आयफोन 11 झाला होता लाँच- अ‍ॅपलने 2019 मध्ये आयफोन 11 लाँच केला होता. यात A13 बायोनिक चिपसेटसह 3,110 mAh बॅटरी आहे. हँडसेटला 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले आहे. हा फोन आयपीएस एलसीडी पॅनेलनं सुसज्ज आहे. तसंच फोनमध्ये वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससाठी IP68 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. युझर्सना या फोनमध्ये iOS16 अपग्रेडदेखील मिळेल. याशिवाय, या फोनमध्ये 64GB ROM देण्यात आली आहे. आयफोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. फ्रंटला 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय.

    News18लोकमत
    News18लोकमत

    बिग दिवाळी सेलमध्ये तुमच्या खिशाला परवडणाऱ्या अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. त्यातच तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल; पण फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ आणि ‘बिग दसरा सेल’ या दोन्ही सेलमध्ये तो तुम्हाला घेता आला नसेल, तर हा सेल तुमच्यासाठी फोन घेण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण या सेलमध्ये तुम्ही एक्स्चेंज ऑफरमध्ये आयफोन 11 घेतला, तर तो तुम्हाला 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतो. या सेलचा उद्या, रविवारी (23 ऑक्टोबर 2022) हा शेवटचा दिवस आहे हेही लक्षात ठेवा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: apple , iphone
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात