मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, घरी पोहोचेल PVC कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन प्रोसेस

Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, घरी पोहोचेल PVC कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन प्रोसेस

फिजिकल रुपात आधार कार्ड ठेवण्याचा सर्वात सुरक्षित पर्याय पीवीसी कार्ड आहे, जे एटीएम कार्डप्रमाणेच दिसतं.

फिजिकल रुपात आधार कार्ड ठेवण्याचा सर्वात सुरक्षित पर्याय पीवीसी कार्ड आहे, जे एटीएम कार्डप्रमाणेच दिसतं.

फिजिकल रुपात आधार कार्ड ठेवण्याचा सर्वात सुरक्षित पर्याय पीवीसी कार्ड आहे, जे एटीएम कार्डप्रमाणेच दिसतं.

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारी तसंच खासगी कामांसाठीही आधार कार्ड द्यावं लागतं. त्यामुळे ते सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधार लेटर, mAadhaar, पीवीसी कार्ड रुपातही आधार कार्ड मागितल्यास ते दिलं जाऊ शकतं.

आधार कार्ड हरवल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे फिजिकल रुपात आधार कार्ड ठेवण्यापेक्षा स्मार्टफोनमध्ये mAadhaar App डाउनलोड करुन ते सुरक्षित ठेवता येतं. परंतु अद्यापही अनेक लोक फिजिकल रुपातच आधार कार्ड ठेवणं पसंत करतात. फिजिकल रुपात आधार कार्ड ठेवण्याचा सर्वात सुरक्षित पर्याय पीवीसी कार्ड आहे, जे एटीएम कार्डप्रमाणेच दिसतं.

PVC अर्थात हे प्लॅस्टिक आधार कार्ड UIDAI च्या अधिकृत वेबसाईटद्वारे मागवता येतं. त्यासाठी 50 रुपये खर्च येतो. हे मागवण्यासाठीची प्रोसेसही अतिशय सोपी आहे. यासाठी तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर चालू स्थितीत असणं गरजेचं आहे.

- PVC कार्डसाठी सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint.php वर जावं लागेल.

- त्यानंतर आधार नंबर टाकावा लागेल. जर आधार नंबर नसेल, तर mAadhaar app द्वारेही मिळवता येतो.

- आता स्क्रिनवर दिलेल्या सिक्योरिटी कोडद्वारे आधार डिटेल्स वेरिफाय करावे लागतील.

- त्यानंतर मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे की नाही ते तपासा. तुमचा नंबर आधीपासून रजिस्टर्ड असेल, तर खाली दिलेल्या बॉक्समध्ये अनटिक करावं लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करावं लागेल.

Aadhaar Card द्वारे घेऊ शकता पर्सनल लोन, जाणून घ्या सोपी प्रोसेस

- ओटीपीद्वारे फोन नंबर वेरिफाय करावा लागेल.

- वेरिफिकेशनंतर 50 रुपये भरावे लागतील. पेमेंटनंतर UIDAI तुमची ऑर्डर प्रोसेस करेल.

PVC Aadhaar Card ऑर्डर केल्यानंतर दोन आठवड्यांनंतर ते घरपोच मिळतं. यासाठी UIDAI ने पोस्ट ऑफिससह पार्टरनशिप केली आहे जेणेकरुन पीवीसी कार्ड ग्राहकांना घरपोच मिळेल.

First published:
top videos

    Tags: Aadhar card, M aadhar card