मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Aadhaar Card द्वारे घेऊ शकता पर्सनल लोन, जाणून घ्या सोपी प्रोसेस

Aadhaar Card द्वारे घेऊ शकता पर्सनल लोन, जाणून घ्या सोपी प्रोसेस

आधारद्वारे पर्सनल लोन घ्यायचं असल्यास, बँकांमध्ये ऑनलाईन अर्ज करता येतो.

आधारद्वारे पर्सनल लोन घ्यायचं असल्यास, बँकांमध्ये ऑनलाईन अर्ज करता येतो.

आधारद्वारे पर्सनल लोन घ्यायचं असल्यास, बँकांमध्ये ऑनलाईन अर्ज करता येतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : देशातील प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सर्वच सरकारी आणि खासगी कामांसाठी आधार कार्ड द्यावं लागतं. एवढंच नाही, तर आधार कार्डद्वारे लाखोंचं कर्जही (Aadhaar Card Loan) मिळू शकतं. प्रत्येक बँकेत कर्जासाठी काही कागदपत्र मागितली जातात. यात आधार कार्ड आणि पॅन कार्ड सर्वात महत्त्वाची कागदपत्र ठरतात.

KYC अंतर्गत बँकांकडून काही कागदपत्र मागितले जातात. यात आधार कार्ड सर्वात वैध डॉक्युमेंट ठरतं. आधार कार्ड एकत्रच ओखळपत्र तसंच अ‍ॅड्रेस प्रुफ देत असल्याने ते महत्त्वाचं ठरतं. आधारद्वारे पर्सनल लोन घ्यायचं असल्यास, बँकांमध्ये ऑनलाईन अर्ज करता येतो.

असा करा अर्ज -

- ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे आणि जे बँक खातं तुमच्या नावे आहे, त्याचं मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा किंवा त्या बँकेच्या पोर्टलवर जा.

- बँकेच्या वेबसाईट किंवा अ‍ॅपद्वारे लॉगइन करावं लागेल.

- इथे Loan चा पर्याय दिसेल. त्यात Personal Loan वर क्लिक करावं लागेल.

- इथे तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र आहात का, ते तपासता येईल.

- पात्रता ठरल्यानंतर Apply Now वर क्लिक करा.

- आता ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन भरण्याबाबत सांगितलं जाईल. यात पर्सनल, रोजगारसंबंधी आणि व्यवसायाबाबत माहिती मागितली जाईल.

- त्यानंतर बँकेचे कर्मचारी फोन करुन तुमच्या डिटेल्सचं वेरिफिकेशन करतील.

- आधार कार्डची एक कॉपी अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल.

- त्यानंतर बँकेकडून तुमची आणि आधारची माहिती वेरिफाय केली जाईल आणि खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

RBI New Guidelines:बदलणार ऑनलाईन पेमेंट पद्धत,लक्षात ठेवावा लागेल 16 अंकी नंबर

ही सुविधा घेण्यासाठी कमीत-कमी 23 आणि जास्तीत-जास्त 60 वर्ष वय असावं लागतं. अर्ज करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असणं गरजेचं असून तो एखाद्या सरकारी, खासगी किंवा मल्टीनॅशनल कंपनीत काम करणार असावा. कर्ज घेण्यासाठी तुमचा आधीचा क्रेडिट स्कोर योग्य असावा. तसंच किमान मासिक उत्पन्नाची मर्यादा निश्नित करण्यात आली आहे, ती अर्जदाराला पूर्ण करावी लागेल.

First published:

Tags: Aadhar card