नवी दिल्ली, 5 जानेवारी : जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात तुमची गाडी ट्रान्सफर करत असाल किंवा दुसऱ्या शहरात विकत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अनेकांना गाडीसाठी NOC ची गरज असल्याची माहिती नसते. गाडीमध्ये इलेक्ट्रिक किट लावण्यापासून अनेक परिस्थितीत गाडीसाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अर्थात NOC ची गरज असते. ही NOC RTO ऑफिसमधून किंवा ऑनलाइनही इश्यू करता येते.
का असते NOC ची गरज?
ज्यावेळी तुम्ही तुमच्या घराचा पत्ता बदलता, त्यावेळी NOC ची गरज असते. तुमचं कोणतंही कर्ज, फी बाकी नसल्याचा पुरावा NOC देते. कारचा कलर बदलण्यासाठीही NOC ची गरज असते.
NOC साठी आवश्यक डॉक्युमेंट्स -
- पॉल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (PUCC)
- अप-टू-डेट पेमेंट रोड टॅक्स रिसिप्टची वैध डॉक्यूमेंट
- वाहनाची इन्शुरन्स पॉलिसी सर्टिफाइड फोटोकॉपी
- वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची फोटोकॉपी
- अॅप्लिकेशन (फॉर्म 28)
- इंजिन नंबर आणि चेसिस नंबर प्रिंट
- वाहनाच्या मालकाचं सिग्नेचर Identification
कसं कराल NOC साठी ऑनलाइन अप्लाय?
- सर्वात आधी https://Parivahan.Gov.In/Parivahan/Hi च्या अधिकृत साइटवर जा.
- Application For No Objection Certificate वर सिलेक्ट करा.
- पुढील पेजवर आवश्यक डिटेल्स टाका.
- आता Validate Registration Number/Chassis Number सिलेक्ट करा.
- आता रजिस्टर्ड मोबाइल नंबर एंटर करा आणि OTP जनरेट करा. Show Details वर क्लिक करा.
- वेबसाइट एक अॅप्लिकेशन फॉर्म जनरेट करेल, त्या फॉर्मवर डेटा तपासा
- जर अॅप्लिकेशनमध्ये कार इन्शुरन्स डिटेल्स सामिल नसतील, तर ते डिटेल्स Add करा.
- नवा RTO कोड एंटर करा आणि Save वर क्लिक करा.
- प्रोसेस पूर्ण करण्यासाठी पेमेंट करावं लागेल. पेमेंट रिसिप्टची प्रिंटआउट काढायला विसरू नका. त्यानंतर पुढील प्रोसेससाठी आवश्यक डॉक्युमेंट्स आणि फी रिसिप्टसह संबंधित RTO वर जा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car