मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या फोनमध्ये धोकादायक Pegasus स्पायवेअर आहे का? या टूलने मिळेल माहिती

तुमच्या फोनमध्ये धोकादायक Pegasus स्पायवेअर आहे का? या टूलने मिळेल माहिती

Print Scanner, Read Scanner, Translate Free, Comply QR Scanner, PDF Converter Scanner, Delux Keyboard, Private Message, Font Style Keyboard, Free Affluent Message, Saying Message हे 11 अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील, तर लगेच डिलीट करा.

Print Scanner, Read Scanner, Translate Free, Comply QR Scanner, PDF Converter Scanner, Delux Keyboard, Private Message, Font Style Keyboard, Free Affluent Message, Saying Message हे 11 अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील, तर लगेच डिलीट करा.

Amnesty International च्या रिसर्चरने एक टूल पब्लिश केलं आहे. याद्वारे फोन धोकादायक Pegasus spyware ने प्रभावित आहे की नाही हे समजेल.

नवी दिल्ली, 21 जुलै: पेगासस स्पायवेअर (Pegasus) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याबाबत अनेक युजर्स चिंतेत असून आपल्या फोनमध्ये Pegasus व्हायरस तर नाही ना? याबाबत जाणून घेऊ इच्छित आहेत. यासाठी एक सोपी पद्धत आहे, ज्याद्वारे तुमचा फोन पेगाससने प्रभावित आहे की नाही हे ओळखता येईल.

TechCrunch च्या रिपोर्टनुसार, Amnesty International च्या रिसर्चरने एक टूल पब्लिश केलं आहे. याद्वारे फोन धोकादायक Pegasus spyware ने प्रभावित आहे की नाही हे समजेल. या टूलचं नाव मोबाईल वेरिफिकेशन टूलकिट (MVT) असं आहे. हे टूल Amnesty International रिसर्चरने डिझाईन केलं आहे. MVT अँड्रॉईड आणि आयफोन दोन्ही डिव्हाईसमध्ये काम करतं. हे टूल GitHub वर फ्रीमध्ये उपलब्ध आहे.

हे टूल स्पायवेअरच्या वापरासाठी एखाद्या कॉम्प्रोमाइज इंडिकेटरला डिटेक्ट करू शकतं. आयफोनसाठी मोबाईल वेरिफिकेशन टूलकिट, बॅकअप आणि कॉम्प्रोमाइजच्या कोणत्याही इंडिकेटरला रीड करू शकतों. अँड्रॉईड डिव्हाईससाठी हे टूल NSO Group च्या डोमेनने पाठवलेल्या SMS किंवा Text चा बॅकअप चेक करतो. तसंच हे टूल फोनमधील सर्व Apps देखील चेक करतो, जेणेकरुन ते कॉम्प्रोमाइज आहे की नाही याची माहिती मिळेल.

Pegasus Spyware चा धोका; कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, WhatsApp सह इतर डेटा हॅक होण्याची शक्यता

2019 रोजी काही व्हॉट्सअ‍ॅप युजर्सवर याचा अटॅक झाल्यानंतर भारतात हे नाव ऐकण्यात आलं होतं. या व्हायरस पीडित लोकांना व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेगाससने त्यांच्या फोनवर कब्जा केल्याचं मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं. अनेक प्रमुख वेबसाईट्सवरुन मिळालेल्या माहितीनुसार, भारतात 40 हून अधिक पत्रकार, कार्यकर्ते आणि इतर प्रमुख लोक सामिल होते, ज्यांच्यावर या व्हायरसद्वारे नजर ठेवली जात होती.

First published:
top videos

    Tags: Spyware, Tech news