नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. बँक अकाउंट ओपन करणं, वाहन नोंदणीकरण, होम लोन अशा सर्वच खासगी आणि सरकारी कामासांठी आधार कार्ड महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे आधार कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अॅक्सेस करणं गरजेचं आहे. UIDAI ने नुकतंच आधारबाबत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणं गरजेचं नसेल. विना रजिस्टर्ड फोन नंबरद्वारेही आधार डाउनलोड करता येणार आहे.
विना रजिस्टर्ड मोबाईल नंबर Aadhaar Download करण्यासाठी -
- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर https://uidai.gov.in/ जा.
- होम पेजवर My Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर 'Order Aadhaar Reprint' वर क्लिक करा.
- 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी वर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबर (VID) टाका.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोड टाका. त्यानंतर मोबाईल नंबरशिवाय आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी 'My Mobile number is not registered' वर क्लिक करा.
- त्यानंतर दुसरा non-registered किंवा Alternate Number द्यावा लागेल आणि Send OTP वर क्लिक करावं लागेल. पुढे Submit वर क्लिक करावं लागेल.
- ओटीपी वेरिफाय केल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. इथे 'Preview Aadhaar Letter' डिटेल्स पाहता येतील. आता पेमेंट पर्यायावर क्लिक करुन PDF डाउनलोड करण्यासाठी डिजीटल सिग्निचरही द्यावी लागेल.
- शेवटी SMS द्वारे सर्विस रिक्वेस्ट नंबर मिळेल. आधार कार्ड मिळेपर्यंत, ही ऑनलाईन प्रोसेस ट्रॅक करण्यासाठी या नंबरचा उपयोग करावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, M aadhar card