मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल, तरी असं डाउनलोड करा तुमचं Aadhaar कार्ड, जाणून घ्या सोपी प्रोसेस

मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल, तरी असं डाउनलोड करा तुमचं Aadhaar कार्ड, जाणून घ्या सोपी प्रोसेस

याआधी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करणं अनिवार्य होतं. परंतु आता याची गरज नसून मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यासही आधार कार्ड डाउनलोड करता येऊ शकतं.

याआधी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करणं अनिवार्य होतं. परंतु आता याची गरज नसून मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यासही आधार कार्ड डाउनलोड करता येऊ शकतं.

याआधी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करणं अनिवार्य होतं. परंतु आता याची गरज नसून मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यासही आधार कार्ड डाउनलोड करता येऊ शकतं.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : Aadhaar Card सर्व भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. UIDAI कडून जारी करण्यात येणारं हे डॉक्युमेंट सर्व सरकारी कामांसाठी तसंच खासगी कामांसाठीही आवश्यक ठरतं. आधार कार्ड UIDAI च्या वेबसाइटवरुन कधीही डाउनलोड करता येतं. परंतु ज्या लोकांचा मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये रजिस्टर्ड नाही, अशांसाठी UIDAI ने महत्त्वाची घोषणा केली आहे. याआधी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करणं अनिवार्य होतं. परंतु आता याची गरज नसून मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यासही आधार कार्ड डाउनलोड करता येऊ शकतं.

Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, अशाप्रकारे मिळवता येईल परत

विना मोबाईल नंबर कसं डाउनलोड कराल आधार कार्ड?

- Aadhaar डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत https://uidai.gov.in/ वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर MyAadhaar सेक्शनवर टॅप करावं लागेल.

- त्यानंतर Order Aadhaar PVC Card वर क्लिक करावं लागेल.

- आता 12 अंकी Aadhaar Number टाकावा लागेल. त्याशिवाय 16 अंकी VID नंबरही टाकता येऊ शकतो.

- या प्रोसेसनंतर सिक्योरिटी कॅप्चा कोड टाकावा लागेल.

- मोबाईल नंबरशिवाय आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी My Number is not registered पर्यायावर क्लिक करा.

- त्यानंतर तुमचा पर्यायी नंबर किंवा रजिस्टर्ड नसलेला नंबर टाकू शकता.

- आता Send OTP वर क्लिक करा. तुम्ही टाकलेल्या नंबरवर OTP येईल. नियम आणि अटी या चेक बॉक्सवर क्लिक करुन सबमिट करा.

- त्यानंतर युजरला नव्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. Payment पर्यायावर क्लिक करावं लागेल. युजरला डिजिटल स्वाक्षरीही तयार ठेवावी लागेल, PDF डाउनलोड करताना ती अपलोड करावी लागेल. शेवटी SMS द्वारे सर्विस रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल. त्या नंबरद्वारे अॅप्लिकेशन स्टेटस ट्रॅक करता येईल.

First published:
top videos

    Tags: Aadhar card, Aadhar card on phone, M aadhar card, Tech news