जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

ज्या चारचाकी वाहनांमध्ये 8 लोकांच्या बसण्याची क्षमता असते, त्या गाड्यांमध्ये 6 एयरबॅग्स अनिवार्य रुपात लावण्याची तरतूद केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जानेवारी : गाडी चालवणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे फोर व्हीलर अपघातात लोकांचे मृत्यू कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या चारचाकी वाहनांमध्ये 8 लोकांच्या बसण्याची क्षमता असते, त्या गाड्यांमध्ये 6 एयरबॅग्स अनिवार्य रुपात लावण्याची तरतूद केली जात आहे. यासंदर्भातील अधिसूचनेचा मसुदा मंजूर करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांनी सांगितलं, की यापैकी 2 Torso एयरबॅग्स (Airbags) असतील. तर 2 Tube एयरबॅग्स असतील. या निर्णयानंतर भारतात मोटर व्हिकल सेफ्टीमध्ये मोठ्या सुधारणा होतील आणि अपघातात लोकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत होईल.

हे वाचा -  30 हजारात फोर्ड! सांगलीकराने बनवली जुगाड Ford,रिक्षाप्रमाणे हँडल मारुन होते सुरू

सध्या केवळ महागड्या गाड्यांमध्येच Airbags ची सुविधा मिळते. सामान्य कार्समध्ये कंपन्या ही सुविधा देत नाही. बजेट कार्समध्ये Airbags लावल्याने त्याची किंमत वाढू शकते, असा कंपन्यांचा तर्क आहे. याचा त्यांच्या विक्रीवरही परिणाम होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचा -  नवी बजेट Car घेताय?देशात महाराष्ट्रामध्ये Electric Car वर मिळतेय सर्वाधिक सबसिडी

परंतु आता नितीन गडकरी यांनी Airbags ची सुविधा सर्व ब्रँड्सच्या कार्समध्ये उपलब्ध होईल असं म्हटलं आहे. कोणतीही कंपनी कारची किंमत, वेरिएंट किंवा सेगमेंटच्या आधारे यात कपात करू शकत नाही. एखाद्या Fortuner कारमध्ये 6 एयरबॅग्स असतील, तर मारुति कारच्या 8 सीटर कार्समध्येही इतकेच एयरबॅग्स असतील. Airbags च्या सुविधेमुळे अपघात झाल्यास, लोकांचा गंभीर दुखापतीपासून बचाव होईल, तसंच त्यांच्या जीवालाही कमी धोका असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात