Home /News /technology /

तुम्हीही Online Fraud चे बळी ठरला आहात का? चिंता नको; अशी करा रीतसर Complaint

तुम्हीही Online Fraud चे बळी ठरला आहात का? चिंता नको; अशी करा रीतसर Complaint

अशी करा रीतसर Complaint

अशी करा रीतसर Complaint

ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाल्यास नेमकं काय करावं हे अनेकांना महिती नसतं. केंद्र सरकारने (Central Government) अशा प्रकारच्या घटना घडल्यास तक्रार दाखल करण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे.

  मुंबई, 05 मे:  अलीकडच्या काळात डिजिटलायझेशनमुळे कोणतंही काम करणं खूप सोपं झालं आहे. आजकाल शिक्षण, जॉब, शॉपिंग, बिलं भरणं आदी कामं घरबसल्या ऑनलाईन (Online) करता येतात. ऑनलाईनमुळे जवळ रोख रक्कम बाळगण्याचीदेखील गरज राहिलेली नाही. एकूणच विचार करता ऑनलाईनमुळे आपलं जीवन काहीसं सुखकर झालं आहे. परंतु, ऑनलाईनचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेदेखील आहेत. सर्वच बाबी ऑनलाईन झाल्यामुळे सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Crime) प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. कधी निनावी फोन करून तर कधी लिंक शेअर करून फसवणूक केली जात आहे. बक्षीस, लॉटरी, जॉब इतकंच काय तर शासकीय योजनांच्या लाभाचं अमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे शहरी भागातल्या लोकांसोबतच ग्रामीण भागातले लोकही सायबर गुन्हेगारीला बळी पडत आहेत.  ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाल्यास नेमकं काय करावं हे अनेकांना महिती नसतं. केंद्र सरकारने (Central Government) अशा प्रकारच्या घटना घडल्यास तक्रार दाखल करण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे. या विषयीची माहिती `टीव्ही 9 हिंदी`ने दिली आहे. ऑनलाईन माध्यमातून आर्थिक किंवा कोणत्याही स्वरुपाची फसवणूक झाल्यास सर्वप्रथम काय करावं, हे अनेकांना माहिती नसतं. सायबर गुन्हेगारीबाबत नागरिकांना तक्रार दाखल करता यावी, यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं ( Home Ministry) एक विशेष पाऊल उचललं आहे. यासाठी या विभागानं https://www.cybercrime.gov.in/ ही वेबसाईट सुरू केली आहे. या माध्यमातून तक्रारदाराला सर्वतोपरी मदत दिली जाते. तसंच या ठिकाणी तुम्ही तक्रारदेखील दाखल करू शकता आणि तुम्ही केलेल्या तक्रारीचं स्टेट्स काय आहे हेदेखील पाहाता येतं. या Mental Health Apps द्वारे चोरी होतोय युजर्सचा डेटा, तुमच्या फोनमध्ये तर नाही?
  याशिवाय तुमची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर हेल्पलाइन क्रमांकावर तत्काळ फोन करू शकता. यासाठी शासकीय हेल्पलाईन क्रमांक (Helpline Number) या पूर्वी 155260 असा होता. परंतु, हा क्रमांक आता बदलला आहे. आता तुम्हाला मदतीसाठी 1939 हा क्रमांक डायल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सर्वोतोपरी मदत केली जाईल.
  सायबर गुन्ह्यांसंबंधी तक्रार दाखल करण्यासाठी गृह मंत्रालयाने वेबसाईट सुरू केली आहे. या पोर्टलवर तुम्ही सायबर गुन्ह्यासंदर्भात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर पीडित किंवा तक्रारदारास मदत दिली जाते. हे पोर्टल सायबर गुन्हेगारीशी संबंधित तक्रारींकरता त्यातही विशेषकरून महिला आणि मुलांवरील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी आहे. या पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारींबाबतचा तपास संबंधित राज्य पोलीस, राज्य किंवा केंद्रीय कायदेशीर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पूर्ण केला जातो. अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई व्हावी, यासाठी तक्रार दाखल करताना संपूर्ण आणि बिनचूक माहिती देणं आवश्यक आहे. दिलेली माहिती संपूर्ण आणि बिनचूक असेल तर तपास यंत्रणांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. सायबर गुन्ह्यांसंदर्भात गृह मंत्रालयाने सुरू केलेल्या वेबसाइटवर तुम्ही मोबाइलद्वारे (Mobile) देखील तक्रार करू शकता. यासाठी सर्वप्रथम मोबाइलमधल्या ब्राउझरवर जावं. त्यानंतर https://www.cybercrime.gov.in/ या वेबसाईटवर जावं. वेबसाईट सुरू झाल्यावर तुम्हाला `तक्रार दाखल करा` असा पर्याय दिसेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही तक्रार दाखल कऱण्यासाठीच्या पेजवर जाल. या ठिकाणी तुम्हाला महिला किंवा बाल अपराध आणि सायबर क्राइम असे दोन पर्याय दिसतील. यापैकी योग्य पर्याय निवडावा. त्यानंतर माहिती भरण्यासाठी पेज ओपन होईल. इथं तुम्ही आवश्यक ती सर्व माहिती भरू शकता. जर तुम्ही प्रथमच तक्रार दाखल करत असाल तर तुम्हाला तुमचं अकाउंट रजिस्टर करावं लागेल. आवश्यक ती सर्व माहिती देत तुम्ही तुमचा लॉगिन आयडी तयार करू शकता आणि नंतर तक्रार दाखल करू शकता. ट्विटरसाठी मोजावे लागणार पैसे, इलॉन मस्क यांची घोषणा
  या वेबसाईटवर तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर काय कार्यवाही झाली, याची माहिती तुम्ही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला याच वेबसाईटवर जाऊन `ट्रॅक अ‍ॅण्ड कंप्लेंट` हा पर्याय निवडावा लागेल. याठिकाणी तुम्ही तुमचा तक्रार क्रमांक टाकल्यावर ज्या सायबर गुन्हेगारीविषयी तक्रार आहे, त्यावर पोलीस आणि तपास यंत्रणांनी काय कारवाई केली आहे, याचे अपडेट तुम्हाला मिळतील.
  First published:

  Tags: Online fraud, Technology

  पुढील बातम्या