नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : अनेक राज्यात हाय सिक्योरिटी नंबर प्लेट (High Security Number Plate) अनिवार्य करण्यात आलं आहे. तुम्हीही अद्याप आपल्या वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावली नसेल, तर ती लावणं फायद्याचं आहे. अन्यथा अनेक कामात अडथळे येऊ शकतात.
High Security Number Plate -
हाय सिक्योरिटी नंबर प्लेटवर HSRP होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाचं इंजिन आणि चेसिस नंबर असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट वाहनाची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता बनवण्यात आली आहे. हा नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पीन असते, जी वाहनाला जोडलेली असते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते.
हाय सिक्योरिटी नंबर प्लेटशिवाय ही काम होणार नाहीत -
विना HSRP वाहनच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सेकेंड कॉपी
वाहनाचं रजिस्ट्रेशन ट्रान्सफर
अॅड्रेस चेंज
रजिस्ट्रेशन रिन्यूवेशन
नो ऑबजेक्शन सर्टिफिकेट
हायपोथॅकेशन कॅन्सेलेशन
हायपोथॅकेशन एंडोर्समेंट
नवं परमिट
टेम्पररी परमिट
स्पेशल परमिट
नॅशनल परमिट
कसं कराल HSRP ऑनलाईन अर्ज -
हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी दोन पोर्टल तयार करण्यात आले आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खाजगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. खाजगी व्हीकल टॅबवर क्लिक केल्यास पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, CNG आणि CNG+पेट्रोल यापैकी पर्याय निवडावा लागेल. पेट्रोल टाईप टॅबवर क्लिक केल्यानंतर वाहनांची कॅटेगरी खुली होईल. यात बाईक, कार, स्कूटर, ऑटो असे पर्याय असतील. यात काही माहिती भरावी लागेल.
तसंच, गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल.
कोणत्या वाहनावर कोणत्या रंगाचा स्टीकर -
हलक्या निळ्या रंगाचा स्टिकर पेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी तयार करण्यात आला आहे. डिझेल गाड्यांसाठी नारंगी रंगाचा स्टिकर लावणं अनिवार्य आहे. दूरवरूनच वाहनांची ओळख पटावी हा या मागचा हेतू असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर परिवहन विभागाने वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आणि इंधनानुसार रंगीत स्टिकर लावणं अनिवार्य केलं आहे. सुरुवातीला अनेक प्रयत्नांनंतरही याचा सकारात्मक परिणाम न झाल्याने, परिवहन विभागाने याबाबत सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. सुरुवातीला केवळ चार चाकी वाहनांवरच सक्ती असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.