नवी दिल्ली, 8 जानेवारी : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी Aadhaar Card अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारीसह खासगी कामांसाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. 2009 मध्ये आधार कार्ड लाँच करण्यात आलं होतं. आधारसाठी डेटा UIDAI द्वारे एकत्रित केला जातो, UIDAI ही भारत सरकारने स्थापन केलेली वैधानिक प्राधिकरण संस्था आहे. UIDAI केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अखत्यारित येतं. आधार कार्ड सर्वच कामांसाठी महत्त्वाचं ठरत असल्याने अनेकदा आधारच्या नावाने हॅकर्सकडून अनेक फ्रॉड होत असल्याचंही समोर आलं आहे. तसंच नकली आधार कार्डमुळेही सर्वसामान्यांच्या मनात आपल्या आधारबाबत शंका निर्माण होते. त्यामुळे तुमचं आधार कार्ड असली की नकली हे पाहणं फायद्याचं ठरतं. घरबसल्या आधार कार्ड असली की नकली याची माहिती मिळवता येऊ शकते.
लग्नानंतर Aadhaar Card मध्ये तुमचं आडनाव कसं बदलाल? पाहा सोपी प्रोसेस
- सर्वात आधी UIDAI पोर्टल uidai.gov.in वर जा. - ‘My Aadhaar’ वर क्लिक करा. - आता समोर अनेक पर्याय दिसतील. त्यात Verify an Aadhaar Number वर क्लिक करा. - त्यानंतर 12 अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका. - आता Proceed to Verify वर क्लिक करा. - जर तुम्ही टाकलेला मोबाइल नंबर मान्य असेल, तर त्यावरुन एका नव्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. या मेसेजमध्ये आधार नंबरसह वय, लिंग, राज्य अशी माहिती असेल. हे आधी जारी करण्यात आलं होतं का असा उल्लेख इथे केला जाईल. जर कार्ड अद्याप जारी केलं गेलं नसेल, तर ज्या आधार कार्डसाठी तुम्ही सत्यता पडताळणी करत आहात, ते नकली असल्याचं समजेल.