जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / खरंच सरकार तुमचे WhatsApp कॉल आणि मेसेज चेक करणार? काय आहे त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

खरंच सरकार तुमचे WhatsApp कॉल आणि मेसेज चेक करणार? काय आहे त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

खरंच सरकार तुमचे WhatsApp कॉल आणि मेसेज चेक करणार? काय आहे त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

व्हॉट्सअ‍ॅपबाबतचा एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने अधिसूचित केलेल्या नवीन नियमांबाबत हा मेसेज असल्याचं बोललं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 मे : भारतात आयटीचे नवे नियम लागू करण्यात आल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंद आणली जाईल, की व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉक होईल, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅपबाबतचा एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने अधिसूचित केलेल्या नवीन नियमांबाबत हा मेसेज असल्याचं बोललं जात आहे. या मेसेजमध्ये असं म्हटलं जातंय, की सरकार सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे कॉल रेकॉर्ड करेल आणि आपलं डिव्हाईस मंत्रालयाच्या सिस्टमशी कनेक्ट होईल. तसंच या मेसेजमध्ये पुढे असंही सांगण्यात आलं, की WhatsApp मेसेजमध्ये तीन टिक असतात. जर सरकारने तुमच्या एखाद्या मेसेजची दखल घेतली असेल, तर मेसेजला दोन ब्लू टिक आणि एक रेड टिक येईल. मेसेजला तीनही टिक लाल रंगाच्या झाल्यास, सरकारने त्यावर कार्यवाही सुरू केली आहे, असं त्या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे.

(वाचा -  सावधान! Corona Vaccine घेतल्यानंतर तुम्ही अशी चूक करू नका; मोदी सरकारकडून इशारा )

परंतु असा मेसेज जर तुम्हालाही आला असेल, तर घाबरु नका. हा मेसेज पूर्णपणे फेक मेसेज असून, सरकारने यापैकी कोणतेही निमय अधिसूचित केलेले नाहीत. कॉल रेकॉर्ड केले जातील आणि अतिरिक्त रेड टिक सिस्टम सुरू करण्याबाबत सरकारकडून कोणतीही बाब नमूद करण्यात आलेली नाही. हा व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा आहे.

(वाचा -  नवीन नियमांचं पालन करण्याचा स्टेटस रिपोर्ट त्वरित सादर करण्याचे केंद्राचे आदेश )

WhatsApp वर सध्या दोन टिक येतात, तुमचा मेसेज पोहोचला आणि वाचला गेला असं दर्शवणारे हे दोन ब्लू टिक आहेत. त्यामुळे अशा रेड टिकसारख्या फॉर्वर्डवर विश्वास ठेऊ नका. हे पूर्णपणे खोटे, फेक मेसेज आहेत. योग्य माहितीसाठी आयटी नियम 2021 पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात