मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ATM मशीनमधून कार्डशिवाय काढता येणार पैसे, QR Code स्कॅनद्वारे होईल कॅश Withdrawal

ATM मशीनमधून कार्डशिवाय काढता येणार पैसे, QR Code स्कॅनद्वारे होईल कॅश Withdrawal

युजर आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग न करताच एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्ड कधी हरवलं, खराब झालं किंवा कुठे विसरल्यास अशा परिस्थितीत कॅश काढता येईल.

युजर आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग न करताच एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्ड कधी हरवलं, खराब झालं किंवा कुठे विसरल्यास अशा परिस्थितीत कॅश काढता येईल.

युजर आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग न करताच एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्ड कधी हरवलं, खराब झालं किंवा कुठे विसरल्यास अशा परिस्थितीत कॅश काढता येईल.

नवी दिल्ली, 17 मे : एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड वापरलं जातं. परंतु आता एटीएम मशीन अपग्रेड गेल्या जात आहेत. NCR Corporation ने UPI प्लॅटफॉर्मवर आपल्या इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विदड्रॉल सोल्यूशनसह देशभरात एटीएम मशीन अपग्रेड करत आहेत. याद्वारे युजर्सला स्मार्टफोनवर असलेल्या UPI App च्या मदतीने पैसे काढण्यासाठी परवानगी देईल.

अर्थात युजर आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग न करताच एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्ड कधी हरवलं, खराब झालं किंवा कुठे विसरल्यास अशा परिस्थितीत कॅश काढता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही ज्या ATM चा वापर करत असाल, ते एटीएम UPI सर्विससह असणं गरजेचं आहे. कोणतंही UPI बेस्ड पेमेंट App Gpay, PhonePay, Amazon Pay, Paytm तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शनसह असणं गरजेचं आहे.

ATM मशिनमधून UPI द्वारे कसे काढता येतील पैसे?

- सर्वात आधी ATM मशीनवर जा आणि Cash Withdrawal ऑप्शन सिलेक्ट करा.

- त्यानंतर ATM मशीनच्या स्क्रिनवर UPI ऑप्शन सिलेक्ट करा.

- आता ATM च्या स्क्रिनवर एक QR Code दिसेल.

- फोनमध्ये कोणतंही UPI App ओपन करा आणि QR Code स्कॅन करा.

- कोड स्कॅन केल्यानंतर जितके पैसे काढायचे आहेत तितकी अमाउंट टाका. पैसे काढण्याची लिमिट लेवल 5000 रुपये आहे.

- आता UPI PIN टाका आणि प्रोसेस करा.

हे वाचा - Facebook Account हॅक झालंय? असं करा रिकव्हर, पाहा सोप्या स्टेप्स

दरम्यान, मागील काही वर्षात सर्वाधिक फ्रॉड प्रकरणं मोबाइल क्यूआर कोडद्वारे (QR Code) समोर आली आहेत. फ्रॉडस्टर्स अनेक नव्या पद्धतींनी लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरी करत आहेत. कोणत्याही व्यक्तीने क्यूआर कोड पाठवून स्कॅन (QR Code Payment) करण्यास सांगितल्यास तो कोड स्कॅन करू नका, अन्यथा मोठा फटका बसू शकतो. QR कोडचा वापर एखाद्याला पेमेंट करण्यासाठी होतो, पेमेंट-पैसे मिळवण्यासाठी नाही. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी कोणी QR कोड स्कॅन करू नका. यामुळे अकाउंट रिकामं होऊ शकतं. ज्यावेळी तुम्ही एखादा QR कोड स्कॅन करता, त्यावेळी पैसे मिळत नाहीत. केवळ बँक अकाउंटमधून पैसे गेल्याचा मेसेज येतो. त्यामुळे चुकूनही पैसे कोणाकडून घेण्यासाठी कोड स्कॅन करू नका, हा फ्रॉड ठरू शकतो.

First published:

Tags: ATM, Money, QR code payment, Tech news