मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Missed Call आणि WhatsApp द्वारे बुक करा LPG Gas Cylinder, जाणून घ्या सोपी पद्धत

Missed Call आणि WhatsApp द्वारे बुक करा LPG Gas Cylinder, जाणून घ्या सोपी पद्धत

घरबसल्या मिस्ड कॉल किंवा WhatsApp चा वापर करुन सोप्या पद्धतीने गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतो.

घरबसल्या मिस्ड कॉल किंवा WhatsApp चा वापर करुन सोप्या पद्धतीने गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतो.

घरबसल्या मिस्ड कॉल किंवा WhatsApp चा वापर करुन सोप्या पद्धतीने गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 जुलै : डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढल्यानंतर अनेक गोष्टी सोप्या, सहज झाल्या आहेत. आता डिजीटल प्लॅटफॉर्मद्वारेच गॅस सिलेंडर बुक (LPG Gas Cylinder Book) करण्याचीही सुविधा दिली जात आहे. घरबसल्या मिस्ड कॉल किंवा WhatsApp चा वापर करुन सोप्या पद्धतीने गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतो.

भारतीय पेट्रोलियम कंपन्या भारत गॅस (Bharat Gas), इंडेन गॅस (Indane Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सिलेंडर बुक करण्याची सर्विस देतात. इंडेन ग्राहक 8454955555 या क्रमांकावर, भारत गॅस ग्राहक 7710955555 या क्रमांकावर आणि एचपी ग्राहक 9493602222 क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन गॅस सिलेंडर बुक करू शकतात.

(वाचा - Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती)

Indane ग्राहकांना WhatsApp द्वारे गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी 7588888824 हा नंबर फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरुन Book किंवा REFILL# असा मेसेज पाठवा. REFILL# पाठवल्यानंतर ऑर्डरबाबत मेसेज येईल. मेसेजमध्ये सिलेंडर डिलीव्हरी कधी येईल याची तारीखही पाठवली जाईल.

HP गॅस सिलेंडर ग्राहकांना 9222201122 या क्रमांकावर Book टाईप करुन WhatsApp वर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलद्वारे मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर मेसेजवर ऑर्डर डिटेल्स येतील.

Bharat Gas सिलेंडर ग्राहकांना मोबाईलमध्ये 1800224344 हा क्रमांक सेव्ह करुन WhatsApp वर Hi किंवा Hello पाठवावं लागेल. रिप्लाय आल्यानंतर Book टाईप करुन पाठवावं लागेल. त्यानंतर ऑर्डर डिटेल्स येतील सिलेंडर कधी डिलीव्हर होईल याबाबतही माहिती दिली जाईल.

(वाचा - तुमचं बँक अकाउंट Aadhaar नंबरने हॅक होऊ शकतं का? UIDAI ने दिलं उत्तर)

महत्त्वाची बाब म्हणजे, WhatsApp आणि मिस्ड कॉलद्वारे सिलेंडर बुक करण्याची सुविधा केवळ त्याच मोबाईल नंबरला मिळेल, जो तुमच्या गॅस सिलेंडर एजेन्सीमध्ये रिजस्टर्ड आहे. विना रजिस्टर्ड नंबरशिवाय अशाप्रकारे गॅस बुकिंग करता येणार नाही.

First published:

Tags: Gas, LPG Price, Whatsapp, WhatsApp user