मुंबई, 8 जुलै : आधार कार्ड (Aadhaar Card) हे आपल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. दैनंदिन आयुष्यात अनेक कामांसाठी आपल्याला आधार कार्डची गरज लागते. अनेक कामांसाठी आपल्याला आधार कार्ड सादर करावं लागतं. ते नसल्यास आपली अनेक कामं रखडतात. त्यामुळं तुमच्यासोबत आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे. शाळा-कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, बँक खातं उघडण्यासाठी, कर्ज काढण्यासाठी, ओळख पटवून देण्यासाठी, सरकारी किंवा निमसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, अशा अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आपल्या आधारकार्डमध्ये आपले बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती असते. ही माहिती सुरक्षित असणं, अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ही माहिती सुरक्षित राहावी, यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल, तर त्याच्या आधार कार्डाबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्या व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर (Aadhaar Card Alert) होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यांचं आधार कार्ड ब्लॉक करणं गरजेचं असते. त्यासाठी ते ब्लॉक कसं करायचं हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. चला तर मग, आज आपण मृत व्यक्तीचं आधार कार्ड कशा पद्धतीनं ब्लॉक करायचं, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
आधारकार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्ही "या' पद्धतीचा अवलंब करू शकता (How to block Aadhar card of deceased person?) :-
स्टेप 1:
कोणत्याही मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे ते ब्लॉक करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
स्टेप 2:
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर, येथे तुम्हाला 'माय आधार' (My Aadhaar Card) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 3:
यानंतर तुम्हाला आधार कार्ड 'लॉक किंवा अनलॉक' पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला येथे मृत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड टाकावा लागेल.
हेही वाचाः Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते महत्त्वपूर्ण माहिती
स्टेप 4:
त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल. आधार कार्ड इथे टाकताच ते ब्लॉक होईल, म्हणजेच आता कोणीही त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करू शकणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Aadhar card on phone